अमित गुरव -: युट्यूब चॅनेल चे पत्रकार तसेच ते मुक्त पत्रकारिता करणारे मुकेश चंद्राकर ( वय ३२) हे ते छत्तीसगड येथे नक्षलवाद्यांच्या एरिया मध्ये कोणत्याही फंडिंग शिवाय बस्तर जंक्शन या नावाने युट्युब चॅनेल चालवत होते . कारण आज ते आपल्यात नसून स्वर्गवासी झाले आहेत . कारण फक्त एकच त्यांनी अन्यायाविरुद्ध प्रस्थापित लोकांच्या विरुद्ध आवाज उठविला.
त्यांची खूपच फेमस आणि आदर्शवादी न्युज
२०२१ मध्ये CRPF च्या जवान आणि नक्षलवाद्यांची दोन्ही बाजूंनी जोरदार फायरींग झाली तेव्हा एका जवानाला नक्षलवाद्यांनी बंदी बनवले होते. तेव्हा याच पत्रकार मुकेश यांनी नक्षलवाद्यांशी सकारात्मक संवाद साधत त्यांना आपल्या टू व्हीलर बाईक वरून त्यांच्या तावडीतून सुटका करून आणले होते.
आपण सर्वजण नवीन वर्षाचे स्वागत करण्यात व्यस्त होतो तेव्हा पासून मुकेश गायब झाले होते. पण त्यांच्या भावाला वाटले मुकेश कोणत्या तरी बातमी साठी गेले असावेत तिथं नेटवर्क कमी असल्याने अनेकदा फोन लागत नाहीत. पण दुसऱ्या दिवशी फोन लागत नाही आणि भाऊ पुन्हा फोन करत नाही म्हंटल्यावर भावाने मित्रांना फोन फिरवले पण शोध लागत नव्हता. एका पत्रकार मित्राने लोकेशन पहिले तेव्हा भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस शोध घेत असताना कुठून तरी एक संडास च्या टॅंक मध्ये एक बॉडी असल्याचे समजले. हा नुकताच बांधला गेला होता आणि पत्रकार मुकेश यांच्या शरीरावर अनेक घाव होते.
इमानदार पत्रकार मुकेश यांची नेमका गुन्हा काय ?
इमानदार असणे हाच गुन्हा असेल तर मुकेश हे दोशीच होते. ते आपल्या भागात आवाज उठवण्याचे काम सातत्याने करून त्यांचा पाठपुरावा करायचे. सध्याचं त्यांनी एक १२० करोड रुपयांच्या रस्त्याच्या कामाची बातमी केली होती ज्यामुळे भ्रष्टाचारी सुकेश ठेकेदाराचा इगो दुखावला त्यांची दोन नंबर मार्गाने कमावलेली संपत्ती मध्ये कमी आली . त्यामुळे त्याने स्वतःच्या भावाच्या मदतीने हे कृत केले असा संशय आहे. बिहार , छत्तीसगड मध्ये गेल्या काही वर्षात हजारो ब्रीज पडले पण कोणाला काही फरक पडत नाही. पण मुकेश सारखे काही पत्रकार यावर आवाज उठवतात पण त्यावर हे भष्टाचार करणारे लोक आवाज दाबण्यासाठी त्यांचा भयानक रीतीने खून करण्यासाठी घाबरत नाहीत. असे म्हणतात की सरकारी ठेकेदारी करायची असेल तर मोठे मोठे संपर्क असावे लागतात. ज्यातून त्यांना कामे मिळू शकतील. आता हे संपर्क असण्यासाठी काहीतरी देवाण घेवाण होत असेल तर त्यावर पुरावा कोण आणि कसा देणार ?
पत्रकारितेवर जनतेचा नाराजीचा सुर
पत्रकारिता करतोय म्हणजे याच्या हाताला खजिना सापडला आहे किंवा सापडणार आहे असा अंदाज काही नेटकरी बांधतात. आणि त्यावर चुटकुले पाठवून निंदा नालस्ती करतात. ( त्यांची तरी काय चूक त्यांना कोणीतरी भडकवले की ते भडकतात )
एकदा पत्रकार आपल्या म्हणण्याप्रमाणे वागत नसेल आणि झुकत नसेल तर सर्वप्रथम त्याला बदनाम करण्याचे कारस्थान रचले जाते आणि तरीही तो ऐकत नसेल तर शेवट भयानक मृत्यू अटळ आहेच. जे ग्रामीण भागात पत्रकारिता करतात त्यांची तर तारेवरची कसरत असते. कमी मानधन किंवा नसल्यात जमा त्यात बक्कळ पैसा कमवणाऱ्या धनाढ्य लोकांकडून मानसिक , शारीरिक तसेच इतर हल्ले ही आज काल नित्याची बाब झाली आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांना साधे इन्शुरन्स पॉलिसी घेणे परवडणारे नसल्याने त्याला ती चैन वाटणे स्वाभाविक आहे.
यासाठी सर्वसामान्य लोकांचे आवाज असणाऱ्या पत्रकारांवर हल्ले होऊ नयेत याची काळजी जनतेच घ्यावी ( कारण सरकार किती आणि कोणाची काळजी घेणार ) . जर असा हल्ला झालाच तर जाहीर पणे त्या पत्रकारांना प्रोत्साहन आणि बळ देण्यासाठी एकवटून लठा दिला नाही तर चौथा स्तंभ मोडकळीस आला असे म्हणायला पुढे येऊ नका.
आज आमच्या तील एक सहकारी गेला पण त्यांचा उद्देश आणि आवाज उठवण्याची प्रेरणा अनेकांना देऊन गेला. मुकेश च्या कोटुंबियांच्या दुःखात लिंक मराठी परिवार सामील आहे.
मुख्यसंपादक