अमित गुरव ( भादवण) -: गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा ; सालाबाद प्रमाणे यावर्षी हरिनाम सप्ताह सोहळा १८/४/२०२५ ते २५/४/२०२५ पर्यंत आयोजित केला आहे.
पहाटे ४ ते ६ काकड आरती, ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण , ३ ते ४ गाथा भजन , ४ ते ५ हरिपाठ , ६ ते ७ प्रवचन , ८:३० ते १०:३० कीर्तन , रात्री ११ नंतर हरीजागर असे सप्ताहाचे सर्वसाधारण स्वरूप . भव्य दिंडी सोहळा २५ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता होईल असे जाहिरात पत्रात नमूद केले आहे.

यासाठी दैनंदिन पुजारी व व्यासपीठ ह. भ. प निवृत्ती महाराज केसरकर आणि ह . भ. प नामदेव महाराज सुतार , ह .भ .प ज्ञानेश्वर महाराज शिंदे , भादवन ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले. कीर्तनाचा लाभ घेतलेले भक्त सात दिवस कधी संपले कळलेच नाही अश्या शब्दात भावना व्यक्त करत होते.

मुख्यसंपादक