आजरा – (अमित गुरव) -: राजाराम केसरकर (गोकुळ शॉपी ) पासून आयडियल कॉलनी व गांधीनगर ओठा पर्यंत सार्वजनिक बांधकाम अंतर्गत बांधलेली आरसीसी गटर पूर्णपणे मधोमध बांधली आहे . तरी ज्या ठेकेदाराने हे बांधकाम केले आहे व ज्या अधिकाऱ्याच्या निरीक्षणाखाली झाले आहे त्यांच्यावर कारवाई करून सदर गडर हद्दिप्रमाने बांधण्यात यावी.
आमच्या मागणी नुसार मुख्य अभियंता एस आर सावंत , आणि कुंभार यांनी पाहणी केली व दोन दिवसाची कारवाई करण्यासाठी वेळी घेतली ती पूर्ण होऊनही आजतागायत त्यावर कारवाई केली नाही किंवा आम्हाला संपर्क केला नाही .
या कारणामुळे नाईलाजास्तव आम्ही आयडियल कॉलनी आजरा गांधीनगर मुख्य स्त्यावर रस्ता रोको व सार्वजनिक बांधकाम विभाग आजरा समोर ठिय्या आंदोलन अन्याय निवारण समिती आजरा तर्फे नियोजन करीत आहोत. जोपर्यंत आमच्या मागणीवर ठोस निर्णय घेण्यात येणार नाही तोपर्यंत सबंधित ठेकेदाराची बिले रोखून ठेवावीत असा इशारा अन्याय निवारण समिती आजरा यांनी दिला आहे.
निवेदनावर परशुराम बामणे, विजय थोरावत , गौरव देशपांडे , पांडुरंग सावरतकर, यांच्या सह्या आहेत.
मुख्यसंपादक