आजरा(हसन तकीलदार):-संपूर्ण तालुकावासियांचे लक्ष लागून राहिलेले आजरा नगरपंचायत आगामी सर्वत्रिक निवडणूकीसाठी आरक्षण सोडत अखेर आज जाहीर करण्यात आली. आजरा-भुदरगचे प्रांताधिकारी हरीश सूळ, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आले. या अगोदरच नगराध्यक्ष पदासाठी खुले आरक्षण पडल्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी होण्याची चिन्हे दिसत आहेत. नगराध्यक्षाच्या शर्यतीमध्ये प्रत्येकजण आता इच्छुक असल्याचे चित्र दिसत आहे. अजून भरपूर घडामोडी होणे बाकी आहे.
आजरा नगरपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झाल्यापासून प्रत्येकजण आपापल्या जोडणीत लागल्याचे चित्र दिसत आहे.
प्रभाग क्र. 1:-(विद्यानगर, भारत नगर, देसाई कॉलनी)-सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. 2:-(शिवाजी नगर, जिजामाता कॉलनी, नबापूर)-ओ. बी. सी.
प्रभाग क्र. 3:-(अमराई गल्ली):-ओ. बी. सी. महिला
प्रभाग क्र. 4:-(हैदरनगर, दावल मलिक परिसर):-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 5:-(मदरसा कॉलनी):-ओ. बी. सी. महिला
प्रभाग क्र. 6:-(मुल्ला, सिद्धिविनायक, एकता कॉलनी):-सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. 7:-(हरिजनवाडा, दत्त, तुळजाभवानी कॉलनी)अनुसूचित जाती महिला
प्रभाग क्र. 8:-(नाईक गल्ली):-ओ. बी. सी.
प्रभाग क्र. 9:-(दर्गा गल्ली, सुभाष गल्ली, मेनरोड):-ओ. बी. सी. महिला
प्रभाग क्र. 10:-(वाडा गल्ली, कुंभार गल्ली):-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 11:-(गणपत गल्ली, जोशी, रामदेवगल्ली, फकिरवाडा):-सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. 12:-(वाणी गल्ली, पटेल वसाहत, महाजन गल्ली):-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 13:-(सोमवार पेठ, सुतार गल्ली, चर्चगल्ली):-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 14:-(गोठण गल्ली, बर्डे गल्ली):-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 15:-(रवळनाथ कॉलनी, आयडीयल कॉलनी):-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 16-:(गांधीनगर):-सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. 17:-(चाफे गल्ली, आवंडी वसाहत, पारपोलकरकॉलनी):-

सर्वसाधारण महिला
अशा पद्धतीने झालेली सोडत काहींना आनंद तर काहींना नाराजी दिल्याचे दिसत आहे. ज्या वॉर्डात सर्वसाधारण आणि ओबीसी पुरुष आरक्षण पडलेले आहे अशा वार्डातून इतर वार्डातील उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता दिसून येत आहे. यावेळी अण्णाभाऊ समूहाचे अध्यक्ष अशोआण्णा चराटी,अभिषेक शिंपी, विलास नाईक, जनार्दन टोपले,अनिकेत चराटी, नौशादभाई बुडडेखान,बामणे भाऊजी (अन्याय निवारण समिती अध्यक्ष), किरण कांबळे, मंजूर मुजावर, शरीफ खेडेकर, अरिफभाई खेडेकर,रवींद्र भाटले, बाळ केसरकर, विक्रम देसाई, विजय थोरवत, संतोष भाटले, रवींद्र भाटले, महेश पाटील, बंडा कोरगावकर, ओमकार माद्याळकर, बिलाल लतीफ, अभिजित रांगणेकर, रोहन गिरी, भिकाजी विभुते, रेहान तकीलदार यांच्यासह नागरिक उपस्थित होते
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
युट्युब लिंक 👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=8CVnKR338XXteBA3

मुख्यसंपादक



