आजरा (हसन तकीलदार): आजरा तालुका मराठा महासंघाच्या वतीने सलग १९ व्या वर्षी शिवराज्याभिषेकदिनाचे औचित्य साधत वृक्षारोपण करण्यात आले. आंबा, फणस, काजू, करंजी,जांभूळ व मसालेच्या स्थानिक प्रजातीच्या १४० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
सकाळी शिवालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला उपाध्यक्ष शंकराव शिंदे व कार्याध्यक्ष संभाजीराव इंजल यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर पारेवाडी येथील भाऊ निर्मळे यांच्या शेतात स्थानिक प्रजातीच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. सलग १९ वर्षे शिवराज्याभिषेकदिनादिवशी मराठा महासंघाच्यावतीने वृक्षारोपण करण्यात येते. सदरचे वृक्षारोपण हे शेतकऱ्यांच्या शेतात केलेले असल्यामुळे त्यांचे चांगले संगोपन झाले आहे.सध्या फळांचा आस्वाद शेतकरी घेत आहेत याचा आनंद असल्याचे मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे यांनी सांगितले.

वृक्षारोपणास मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, जिल्हा उपाध्यक्ष सी.आर.देसाई, तालुका अध्यक्ष बंडोपंत चव्हाण, उपाध्यक्ष शंकरराव शिंदे, सरचिटणीस प्रकाश देसाई, खजिनदार सूर्यकांत आजगेकर, कार्यकारिणी सदस्य भाऊ निर्मळे, आजी माजी सैनिक वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष दत्तात्रय मोहिते, शिवाजीराव इंजल, चंद्रकांत पारपोलकर, विष्णू सुपल, आनंदा गावडे, महादेव पोवार, शिवाजीराव गुडूळकर, गणपतराव डोंगरे यासह कार्यकर्ते उपस्थित होते. वृक्षारोपणानंतर सी.आर.देसाई यांनी स्नेहभोजन दिले.

Youtube लिंक👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH
- व्हॉट्सॲप चॅनल 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
फेसबुक पेज लिंक 👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
लिंक मराठी वेबसाईट 👇
www.linkmarathi.com
वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.
📲 Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]
*Follow Us*

मुख्यसंपादक