आजरा(हसन तकीलदार)…राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती पंधरवडा निमित्त जिल्हा परिषद कोल्हापूर व पं .स. आजरा शिक्षण विभागाकडून तालुकास्तरावर निबंध ,वक्तृत्व व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील एकूण 11 केंद्रातील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा जिल्हा स्तरासाठी निवड करून त्यांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.यावेळी विलास पाटील ( शिक्षण विस्तार अधिकारी पं.स.आजरा), सुभाष विभुते (केंद्रप्रमुख), रावसाहेब देसाई (केंद्रप्रमुख),माळी सर, संजीव देसाई (मुख्याध्यापक पंडित दीनदयाळ हायस्कूल )व वरील स्पर्धांचे परीक्षक उपस्थित होते.

या स्पर्धेत व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजराचे जिल्हास्तरासाठी निवड झालेले (इयत्ता आठवी ते बारावी )या गटातील यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत.
वक्तृत्व स्पर्धा.. कुमारी सिमरन भिकाजी पाटील,( इयत्ता दहावी) आजरा तालुक्यात प्रथम, जिल्हास्तरीय निवड..
,चित्रकला स्पर्धा.. अथर्व शांताराम नाईक.. (इयत्ता आठवी)आजरा तालुक्यात प्रथम व जिल्हास्तरीय निवड..
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी सर्व संचालक मंडळ प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर, पर्यवेक्षिका.सौ.व्ही.जे.शेलार यांचे प्रोत्साहन लाभले..
व कलाशिक्षक कृष्णा दावणे, व्ही. एच.गवारी व वर्गशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
🌿 आपल्या मातीशी नाळ जुळलेली, आपल्या लोकांच्या हक्काचं व्यासपीठ – Link Marathi 🌿
तुमची गोष्ट, तुमच्याच भाषेत सांगणं हीच आमची जबाबदारी आहे.
🫱 तुमचा पाठिंबा , आमची ताकद!
🎙️ Follow Us 🎙️
You Tube चॅनेल लिंक 👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=9fVf1D0sqOPFWHQS
व्हाट्सअँप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक