आजरा (हसन तकीलदार ):-आजरा तालुक्यातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्र सरकारच्या कृषी विभागाशी संलग्न असलेल्या कृषी विकास आणि ग्रामीण परिवर्तन संस्था आणि आजरा बांबू क्लस्टर फाऊंडेशन च्या वतीने शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला आजऱ्याचे तहसीलदार समीर माने,गटविकास अधिकारी संतोष नागटिळक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

आजरा तालुक्यातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांचे भवितव्य घडवण्याच्या दृष्टीने हे पाऊल आहे. पुढील काळातील योजनाबद्ध कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी उद्या शुक्रवार दि. १८ जुलै २०२५ रोजी होणाऱ्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
मुल्य वर्धन आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी बांबू लागवड कार्यशाळा

कार्यक्रम पत्रिका
सकाळी १०:१५ ते १०:४५ नोंदणी
सकाळी १०:४५ ते ११:०० चहापान
सकाळी ११:०० ते ११:१० उद्घाटन
सकाळी ११:१० ते ११:३० स्वागत आणि प्रास्ताविक- पत्रकार रणजीत कालेकर
सकाळी ११:३० ते ११:४५ उद्घाटकीय भाषण :-समीर माने तहसीलदार आजरा
सकाळी ११:४५ ते दु. १२:०० मनोगत:- संतोष नागटिळक गटविकास अधिकारी आजरा
दुपारी १२:०० ते दु. १२:१५ आजरा बांबू क्लस्टर डेव्हलपमेंट मागील केंद्र सरकारची भूमिका – प्रा. डॉ. विलास जाधव
दुपारी १२:१५ ते दु. १२:३० बांबू लागवड तंत्रज्ञान – सतीश कांबळे
दुपारी १२:३० ते दु. १२:४५ शेतकरी मनोगत:- वसंतराव तारळेकर
दुपारी १२:४५ ते दु. १:०० आभार – दत्तात्रय पाटील
दुपारी १:०० ते दु. २:०० जेवण
शुक्रवार दि १८ जुलै २०२५ रोजी
वेळ :- सकाळी १०:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत
स्थळ :- मिटिंग हॉल, तहसील कार्यालय, आजरा
बांबू उत्पादक व या क्षेत्रात आपले भवितव्य उज्वल करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विकास आणि ग्रामीण परिवर्तन संस्था आणि आजरा बांबू क्लस्टर फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
🟢 दैनंदिन अपडेट्ससाठी खास निमंत्रण!
आपणास महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेची माहिती आणि इतर उपयोगी अपडेट्स दररोज मिळाव्यात, यासाठी आजच खालीलपैकी कोणत्याही पर्यायामध्ये सामील व्हा:
📌 WhatsApp Group – नियमित अपडेट्ससाठी
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
व्हाट्सअप ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/KXy0XT9XJRpChVuADfr21r?mode=r_c
फेसबुक पेज लिंक 👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
You Tube लिंक 👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=4ycB0yncq6Xs8asH

मुख्यसंपादक



