Homeघडामोडीभादवण ग्रामस्थांमध्ये शोककळा — कै. मारुती पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन

भादवण ग्रामस्थांमध्ये शोककळा — कै. मारुती पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन

भादवण ( अमित गुरव ) :
भादवण गावचे ज्येष्ठ नागरिक कै. मारुती दत्तू पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते भादवण गावचे माजी सरपंच श्री. संजय मारुती पाटील यांचे वडील होत. त्यांच्या निधनाने पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण भादवण ग्रामस्थांनी या दुःखद प्रसंगी शोक व्यक्त केला आहे.

कै. मारुती पाटील हे आपल्या शांत, मनमिळावू स्वभावामुळे गावातील सर्वांच्या प्रेमास पात्र ठरले होते. त्यांच्या जाण्याने गावात एक आदर्श नागरिक गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी भादवण येथे पार पडले. या प्रसंगी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यांच्या आत्म्यास परमेश्वर शांती देवो. भादवण ग्रामस्थ त्यांच्या परिवाराच्या दुःखात सामील असून, सर्वांनी त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली.

📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)

🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!

व्हाट्सअप चॅनेल लिंक👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

युट्युब लिंक 👇

https://youtube.com/@linkmarathi-news?si=8CVnKR338XXteBA3

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular