आजरा ( प्रतिनिधी ) -: विदेशी देशाशी संबंध असलेल्या व्हॅलेंटाईन डे साजरा करून आजची तरुण पिढी भरकटत चालले आहे तसेच युवा पिढीला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचवण्यासाठी यावर प्रतिबंध घालावा.

14 फेब्रुवारी हा दिवस तरुण वर्ग प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करतात यातून चुकीच्या प्रथा आणि घटना तरुणांकडून घडत आहेत. या दिवसासाठी हॉटेल कॅफे प्रेक्षणीय स्थळे इत्यादी सार्वजनिक ठिकाणाचा वापर केला जातो यातून अनेकदा वाईट प्रसंग घडले आहेत आणि त्यामुळे तणाव सुद्धा निर्माण होतात हे सर्व बंद होण्यासाठी आपल्या पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घ्यावी असे निवेदन आजारा पोलीस निरीक्षक यांना बजरंग दल यांच्याकडून देण्यात आले आहे.
निवेदनावर हर्षद सावंत, राहुल नेवरेकर , श्रेयस सकट , प्रणव येजरे , अनुज डोनकर , अशोक बोलके दिग्विजय सुतार मंथन हमळकर यांच्या सह्या आहेत.

मुख्यसंपादक