आजरा (हसन तकीलदार ):-खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक याच्या प्रयत्नातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून आजरा तालुक्यातील ग्रामीण भागातील 38 गावाना सोलर हायमास्ट दिवाबत्तीसाठी 7कोटी 10लाखांचा निधी मंजूर झाला असलेबाबतची भाजपचे तालुकाध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर यांनी माहिती दिली.

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने सन 2018-19 पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना नव्याने सुरु केली असून लोकप्रतिनिधीना विद्यमान खासदार आणि विद्यमान आमदार यांनी मागणी केल्याप्रमाणे ग्रामविकास, अल्पसंख्यांक आणि नगरविकासविभागाच्या धर्तीवर शासन स्तरावरून थेट निधी उपलब्ध करून देण्याची राज्य स्तरीय योजना सुरु केली आहे. या योजनेतून लोकप्रतिनिधीनी सुचवलेल्या 118 विकास कामाना शासन स्तरावरून मंजुरी देण्यात आली असून त्या अनुषंगाने खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्या प्रयत्नातून आजरा तालुक्यातील इटे, हाळोली, का. कांडगाव, लाटगाव, मेंढोली-बोलकेवाडी, मुरुडे, मसोली, वझरे, सोहळे, सुळेरान,सिरसंगी, साळगाव, पोळगाव, किणे, किटवडे, हत्तीवडे, देवर्डे, बुरुडे, पेरणोली, आर्दाळ, बेलेवाडी हू., भादवण, चिमणे, धामणे, हाजगोळी बु., हाजगोळी खु., होन्याळी, खेडे, कोळींद्रे, कोवाडे, मडिलगे, मलिग्रे, महागोंड, सरोळी, सुळे, उत्तूर, वाटंगी आणि सरंबळवाडी या गावाना सोलर हायमास्टसाठी निधी उपलब्ध होणार असून सार्वजनिक रस्त्यावरील विजेच्या लपंडावापासून सुटका होऊन गावातील मुख्य आणि मोक्याची ठिकाणे उजळून निघणार आहेत.
🌿 आपल्या मातीशी नाळ जुळलेली, आपल्या लोकांच्या हक्काचं व्यासपीठ – Link Marathi 🌿
तुमची गोष्ट, तुमच्याच भाषेत सांगणं हीच आमची जबाबदारी आहे.
🫱 तुमचा पाठिंबा , आमची ताकद!
🎙️ Follow Us 🎙️
*You Tube चॅनेल लिंक* 👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=9fVf1D0sqOPFWHQS
व्हाट्सअँप चॅनेल लिंक*👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक