Homeघडामोडीचंदगड पंचायत समिती सभापती निवड १० मार्चला ; विलास नाईक आघाडीवर, उपसभापती...

चंदगड पंचायत समिती सभापती निवड १० मार्चला ; विलास नाईक आघाडीवर, उपसभापती पदावर सस्पेन्स कायम

चंदगड -: ( लिंक मराठी न्यूज ) चंदगड पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी १० मार्च २०२६ रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून तालुक्याच्या राजकारणात चांगलीच हालचाल सुरू झाली आहे. तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडणार असून प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

विलास नाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार?

सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य विलास नाईक यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षातील अनुभव, संघटनात्मक पकड आणि गटातील समन्वय यामुळे त्यांच्या नावाला प्राधान्य देण्यात आल्याचे समजते. अधिकृत घोषणा होणे बाकी असले तरी, नाईक यांच्या निवडीवर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.उपसभापती पदावर मात्र चुरससभापती पदाचा पेच सुटल्याचे चित्र दिसत असतानाच उपसभापती पदासाठी मात्र रस्सीखेच वाढली आहे. अनेक इच्छुकांनी गुप्त हालचाली सुरू केल्याने समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे १० मार्च रोजी तहसीलदार राजेश चव्हाण कोणाच्या नावाची घोषणा करतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.या निवड प्रक्रियेनंतर चंदगड पंचायत समितीच्या सत्तासमीकरणाला स्पष्ट दिशा मिळणार असून, आगामी काळात विकासकामांच्या गतीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular