चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड मतदार संघाला सक्षम आणि दूरदृष्टी असणारे नेतृत्व मिळाले नसल्याने वर्षानुवर्षे विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. रस्ते, गटार यापलीकडे इथल्या नेतृत्वाची नजरच गेली नाही. सोसायटी, संघ, गोकुळ यापलीकडे त्यांचं राजकारणच नसल्याने रोजगार, उद्योग हा त्यांचा अवाकाच नसल्याने भागात बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्याला पर्याय द्यायचा असेल तर नेतृत्व बदलायला हवे. त्यासाठी बदला आमदार, वाढवा रोजगार असं म्हणायची वेळ आल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
यावेळी मानसिंग खोराटे यांच्या रूपाने नवा पर्याय देण्याचा ठाम निर्धार कार्यकर्त्यांनी केला. नेसरी जिल्हापरिषद मतदारसंघातील हेळेवाडी, बिद्रेवाडी, हेब्बाळ-जलद्याळ लिंगनुर, दुगुणवाडी, मुंगुरवाडी, तेगीनहाळ या गावांमध्ये जन आशीर्वाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी कार्यकर्त्यांनी मानसिंग खोराटे यांच्यासाठी जीवाचं रान करू अशा विश्वास दिला. यावेळी माजी गोड साखर संचालक बी.एम.पाटील, राजवर्धन शिंदे सांबरेकर, गोड साखर संचालक भरमु जाधव, बाबुराव पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
रस्ते, गटार यापलीकडे जावून मतदरसंघाचा विकास हवा आहे. त्यासाठी विकासाची दृष्टी असणारे नेनलतृत्व हवं आहे. मतदारसंघात इतकी मोठी औद्योगिक वसाहत असून ती ओस पडली आहे. अनेक भूखंड पडून आहेत, तिथे सुविधांची वानवा आहे, त्यामुळे उद्योजक येण्यास तयार नाहीत. त्यामुळे सक्षम नेतृत्व असेल तर त्याठिकाणी एखादा मोठा उद्योग आला तर हजारो सुशिक्षित तरुणांना नोकऱ्या मिळतील. तीच अवस्था महिलांबाबत आहे, महिलांना फुकटचे आमिष देण्यापेक्षा हाताला शाश्वत रोजगार द्या. आज अनेक महिला बचतगट कार्यरत आहेत. पण त्यांच्याकडे लक्ष नाही, त्यांना योग्य दिशा नेण्याची गरज आहे. त्यांना लघु उद्योगाची जोड दिली, त्यांच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास त्यातून महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मिती दोन्ही होऊ शकते. त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.
मानसिंग खोराटे यांनी त्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले, रोजगार मेळावा घेवून तरुणांना नोकऱ्या मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांसाठी वेगळे धोरण आखले आहे. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न असून त्यासाठी राजकीय ताकद हवी आहे. त्यामुळेच या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नारळाची बाग या चिन्हावर मोहोर लावून आपल्या विकासाची नवी दिशा ठरवण्याची वेळ आली आहे. जनसुराज्य पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यापासून चंदगड विधानसभे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. तसेच नारळाची बाग हे चिन्ह मतदारसंघात घराघरात कार्यकर्ते पोचवून मतदारसंघाचे विकासात्मक धोरण जनतेसमोर मांडणार आहेत. त्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते, महिला, युवाशक्तिने निर्धार केला असून नवा आमदार, वाढवा रोजगार अशी घोषणा यावेळी देण्यात आली.
मुख्यसंपादक