Homeघडामोडीलाडकी बहिणीला काँग्रेस चे महालक्ष्मी योजने ने उत्तर तर बेरोजगारांना तरुणांनाही मदत…

लाडकी बहिणीला काँग्रेस चे महालक्ष्मी योजने ने उत्तर तर बेरोजगारांना तरुणांनाही मदत…

दिल्ली -: राज्यात कोणत्याही श्रणी आचारसंहिता जाहीर केली जाऊ शकते. हीच बाब हेरून दोन्ही आघाडी धडाडीने मोठे निर्णय घेत आहेत.
शिंदे सरकार ने नुकताच मुंबईच्या वेशिवरील पाच टोलनाक्यावरील हलक्या वाहनाचा टोल माफ केला . हा निर्णय घेत असतानाच काँग्रेस ने आपली रणनीती आखली आणि सूत्रानुसार ते अनेक मोठी आश्वासने देणार त्यात लाडकी बहिण योजनेला महालक्ष्मी योजने उत्तर देण्याची तयारी सुरू आहे असे समजते.

महालक्ष्मी योजनेत महिलांना प्रतीमहा २००० रुपये.

सध्याच्या महायुती सरकार कडून १५०० रुपयांची मदत महिलांना मिळते पण काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यावर महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून २००० रुपये देण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास या योजनेच्या अंमलबजावणीसाठी साधारण ६० हजार कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे.
त्याच प्रमाणे महाविकास आघाडी सरकार राज्यात आले तर आम्ही कृषी समृध्दी शेतकरी सन्मान योजना लागू करू असे आश्वासन काँग्रेस देण्याची शक्यता आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयांर्यंतच्या कर्ज माफ केलं जाऊ शकते. त्यासाठी २८ हजार कोटी रुपयांची असेल.

स्त्री सन्मान योजना

स्त्री सन्मान योजना अंतर्गत महिलांना बस प्रवास पूर्ण पणे मोफत मिळणार असे आश्वासन जाहीरनाम्यात दिले जाऊ शकते. त्यासाठी १ हजार ४६० कोटी चा निधी अपेक्षित आहे.

सर्व कुटुंबीयांना २५ लाख रुपयांचे विमा

काँग्रेस जाहीरनाम्यात कुटुंब रक्षण योजनेचा समावेश करण्याची शक्यता आहे. या योजनेच्या माध्यमातून सर्वांना २५ लाख रुपयांचे विमा कवच दिलं जाऊ शकते. यासाठी ६ हजार ५५६ कोटी निधी अपेक्षित आहे. 

युवकांना हमी

युवकांना आकर्षित करण्यासाठी काँग्रस बेरोजगारांना प्रतिमहा ४००० रुपये देण्याचे आश्वासन काँग्रेस देऊ शकते. या योजनेच्या माध्यमातून साधारण ६.५लाख युवकांना हा भत्ता मिळू शकेल.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular