Homeघडामोडीकाँग्रेस आणि भाजप भारत देशात विरोध पण भादवण मद्ये ( एकत्र )...

काँग्रेस आणि भाजप भारत देशात विरोध पण भादवण मद्ये ( एकत्र ) युती ?

काँग्रेस आणि भाजप भारत देशात विरोध पण भादवण मद्ये ( एकत्र ) युती ?

भादवण ( अमित गुरव) -: सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधी कोणत्या राजकीय सभेला कधी जातील किंवा कधी कोणत्या पक्षात प्रवेश करतील काही सांगता येत नाही. असाच अनुभव लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जागोजागी येत आहे.
२ दिवसांपूर्वी समरजित घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत भादवण ( तालुका आजरा) येथे संजय मंडलिक यांना मताधिक्य मिळावे यासाठी प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या. मडिलगे , मासेवाडी , खोराटवाडी , भादवणवाडी , जाधेवाडी आश्या गावचे प्रमुख पदाधीकारी हजर होते. मोदी पंतप्रधान म्हणून कसे योग्य आहेत हे घाटगे यांनी मांडले . काही उपस्थित ग्रामस्थ स्वयंप्रेरणेने व्यक्त झाले.


भादवण भाजप गटनेते शैलेश मुळीक यांनी आयोजन केलेल्या या कार्यक्रमात चक्क काँगेस पक्षाचे भादवण गावाचे गट प्रमुख डॉ. गोपाळ केसरकर उपस्थित राहिले आणि त्यांनी भाजपचा मफरल गळ्यात घातलेला पाहून उपस्थित लोकांना अचंबित केले. कारण काही दिवसा पूर्वी आजरा कारखाना निवडणुकीत त्यांचे समर्थक दूध संस्थेचे चेअरमन राजेश जोशिलकर यांना मंत्री मुश्रीफ यांच्या मार्फत उमेदवारी घेऊन विजयी केले होते त्या निवडणुकीत भाजप दोन्ही शिवसेना कॉंग्रेस एकत्र होती पण भादवण मधील कॉंग्रेस राष्ट्रवादी बरोबर होती
जर काँग्रेसचे प्रमुख भाजप मद्ये सामील झाले किंवा त्यांनी मंडलिक यांच्या प्रचाराचे मनावर घेतले तर शाहू महाराज यांचा प्रचार आजरा तालुक्यातील या मोठ्या गावात कोण करणार हा यक्षप्रश्न आहे. गावात मात्र साहेब आपला काँग्रेस पक्ष सोडणार नाहीत तो घेऊन च .मंडलिकांचा प्रचार करतील की भाजप ला झुलवत ठेऊन कांग्रेस चा प्रचार करतील, काही दिवसा पूर्वी त्यांच्या च कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस उमेदवाराचे पत्रक गावात वाटले आहे त्यामुळे नेते भाजप बरोबर आणी कार्यकर्ते कॉग्रेस बरोबर हे चित्र दिसते साहेबांना कोणते पद दिले ? असे उपहासात्मक बोलले जात आहे. आश्याच वेळोवळी गट प्रमुखांच्या बदलत्या भुमिकेमुळे काही वर्ष भादवण गावचा विकास खुंटला होता या सभेपेक्षा या आगळ्या वेगळ्या युती ची चर्चा सर्वत्र आहे.

   काँगेस आणि इंडिया आघाडी ने भादवण येथे सभा आयोजित करून आपले उद्दिष्ट काय ते स्पष्ट करणे अपेक्षित आहे. तसे नाही झाल्यास या गावातून मते मिळवणे अवघड जाणार अशी चिन्हे आहेत.
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular