Homeघडामोडीखंडित वीज पुरवठ्यामुळे नुकसान , वीज पुरवठा सुरळीत करा - काजू प्रक्रिया...

खंडित वीज पुरवठ्यामुळे नुकसान , वीज पुरवठा सुरळीत करा – काजू प्रक्रिया संघटनेचे वीज विभागाला निवेदन

आजरा (हसन तकीलदार ):-आजरा तालुक्यात पांढरे सोने म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या काजू बियांचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते. ऊसपिकाबरोबर काजुलाही नगदी पीक म्हणून ओळख आहे तालुक्यात उत्पादन होत असल्यामुळे काजूबियावर प्रक्रिया करणारे लघु व मध्यम उद्योगही त्याच प्रमाणात आहेत. परंतु गेल्या काही दिवसापासून विजेच्या लपंडावामुळे आणि सातत्याने वीज खंडीत होत असल्यामुळे विजेच्या दाबामध्ये कमी जास्त प्रमाण होऊन उत्पादनात अडथळे येत आहेत आणि यंत्रसामुग्रीही खराब होऊन आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे विजपुरवठ्यांध्ये सातत्य ठेऊन येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात असे निवेदन कॅश्यू मॅन्यूफॅक्चर असोसिएशन आजराने कार्यकारी अभियंता,आजरा यांना दिले आहे.


निवेदनात म्हटले आहे की, आजरा तालुक्यातील अनेक लघु मध्यम काजू प्रक्रिया उद्योगाचे प्रतिनिधित्व करणारी आमची असोसिएशन असून सदर उद्योग काही दिवसापासून सातत्याने खंडित होणाऱ्या, विजेच्या दाबात कमी जास्त पणा होत असल्यामुळे यंत्र सामुग्री खराब होणे, उत्पादनात अडथळा येणे यामुळे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. सद्या पाऊस व वादळवाऱ्यामुळे झाडे, बेटे उन्मळून पडून तारा तुटणे, विजखांब पडणे अशा घटना घडतात हे जरी मान्य असले तरी पावसापूर्वी ही कामे आपणाकडून पूर्ण करून यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे गरजेचे आहे. यापूर्वी सुद्धा दि. 09/06/2025 रोजी याबाबत निवेदन दिले आहे. पुन्हा एकदा आपणास स्मरण होणेसाठी सदरचे निवेदन देत आहोत तरी यावर योग्य त्या उपाययोजना आखून लवकरात लवकर अडचण दूर करावी अन्यथा असोसिएशन तर्फे नाईलाजाने आपले कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदन दिले आहे.

निवेदनावर प्रकाश कोंडूस्कर (अध्यक्ष), दयानंद भुसारी (उपाध्यक्ष),परेश पोतदार (सचिव), विकास फळणेकर (खजिनदार), विश्वास जाधव, भास्कर निकम, विलास पाटील, जयसिंग खोराटे, मनोहर पाटील, विजय कुंभार, उत्तम सलामवाडे, तानाजी कोंडूस्कर, जीवन शेवाळे आदींच्या सह्या आहेत.

📢 अपडेट्स मिळवा – फक्त “लिंक मराठी” वर!

📲 आजच फॉलो करा आणि रहा अपडेटेड!

📺 यूट्यूब चॅनेल: 👉

https://youtube.com/@linkmarathi-news?si=esDLx1PYMWMRWxXk

📘 फेसबुक पेज:👇

https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL

💬 Follow the Link Marathi channel on WhatsApp: 👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

🌐 वेबसाईट:

www.linkmarathi.com

🗣️ स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज आणि सत्य परिस्थिती – आता तुमच्या मोबाईलवर!

📌 “लिंक मराठी” – जे मराठी बोलतं, मराठी जगतं!

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular