इचलकरंजी ( प्रतिनिधी )
इचलकरंजीतील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या गंभीर प्रकरणानंतर आता गावभाग पोलीस ठाण्याच्या “करिअर मार्गदर्शन शाळा” उपक्रमावरही संशय व्यक्त करण्यात येत आहे. विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा थेट आरोप केला असून, या संदर्भात आठवडाभरात पोलीस ठाण्याकडून कोणतीही अधिकृत माहिती माध्यमांना देण्यात आलेली नाही.
राज्य शासनाने डिजिटल मीडियाला अधिकृत मान्यता दिलेली असतानाही, काही पोलीस ठाण्यांमध्ये अजूनही डिजिटल पत्रकारितेकडे दुर्लक्ष व दुजाभाव केला जात असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, या विद्यार्थी आत्महत्या प्रकरणात पारंपरिक माध्यमे शांत राहिली असतानाही डिजिटल माध्यमांनी सातत्याने प्रश्न उपस्थित करत न्यायासाठी संघर्ष केला. मात्र, पोलीस प्रशासनाने संबंधित शैक्षणिक संस्थेला संरक्षण दिल्याचा आरोप नागरिक व पत्रकार संघटनांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर गावभाग पोलीस ठाण्याकडून विद्यार्थ्यांसाठी “करिअर मार्गदर्शन” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तथापि, संबंधित आत्महत्या प्रकरण याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हा उपक्रम हे प्रकरण दाबण्याचा एक प्रयत्न आहे, असा थेट संशय स्थानिक नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.
या संदर्भात पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलढोणे यांनी सांगितले की, “कार्यक्रमात विशिष्ट शैक्षणिक संस्थांचा हस्तक्षेप स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना या कार्यक्रमातून अलिप्त राहत आहे. संवादाच्या नावाखाली सत्य दडपले जाऊ नये, म्हणून आम्ही हा निषेध नोंदवत आहोत.”

ही संपूर्ण घटना पोलीस प्रशासनाच्या पारदर्शकतेवर व माध्यम स्वातंत्र्यावर नव्याने प्रश्न उपस्थित करत असून, विद्यार्थ्यांच्या हितासाठी निर्णय अधिक जबाबदारीने व खुलेपणाने घ्यावेत, अशी अपेक्षा डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे.
आपल्या मातीशी नाळ जुळलेली, आपल्या लोकांच्या हक्काची व्यासपीठ – Link Marathi
तुमची गोष्ट, तुमच्याच भाषेत सांगणं हीच आमची जबाबदारी आहे.
तुमचा पाठिंबा , आमची ताकद!
Youtube लिंक
https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH
- व्हॉट्सॲप चॅनल
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
फेसबुक पेज लिंक
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
लिंक मराठी वेबसाईट
www.linkmarathi.com
वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.
Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]
*Follow Us*

मुख्यसंपादक