आजरा (हसन तकीलदार) :-ईद -ए -मिलाद निमित्त आजऱ्यातील विधायक कार्य करणाऱ्या राहत खिदमत फाउंडेशनतर्फे ग्रामीण रुग्णालय आजरा येथील दाखल असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.
ईद -ए -मिलाद या दिवशी समाजात शांती, कल्याण घेऊन येवो अशी सदिच्छा बाळगत करुणा, सेवा आणि न्याय ही मूल्ये आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करतील त्याचप्रमाणे पैगंबर मुहम्मद स. स्व. यांच्या जीवनातील महान कामगिरीचे स्मरण करण्यासाठी व त्यानुसार जीवनात आचरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी मुस्लिम त्यांचे आदर्श आणि शिकवण स्वीकारण्यासाठी आणि त्यांच्या जीवनातील उदाहरणापासून प्रेरणा घेण्याची प्रतिज्ञा करतात. इस्लामिक इतिहासात हा दिवस प्रेम, एकता आणि अध्यात्मिक जागरूकतेचे प्रतीक मानला जातो. या दिवशी मुस्लिम बांधव लहान मुलांना, निराधार, गरीब, गरजू परीतक्त्यांना अन्नदान करून पुण्य मिळवाण्याचे काम करतात आणि आखिल विश्वाच्या सौहार्द आणि शांतीसाठी प्रार्थना करतात.
आजरा येथील राहत खिदमत फाउंडेशननेही याच धर्तीवर आजरा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल असणाऱ्या सर्व रुग्णांना फळांचे वाटप करून आदर्शवत काम केले आहे. यावेळी राहत खिदमत फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक



