Homeघडामोडीवीज वितरण कंपनी आजरा यांच्यावतीने ' वीज सुरक्षा सप्ताह ' साजरा

वीज वितरण कंपनी आजरा यांच्यावतीने ‘ वीज सुरक्षा सप्ताह ‘ साजरा

आजरा (हसन तकीलदार) :-“सजग ग्राहक, सुरक्षित वीज वापर “या ब्रीदवाक्याखाली वीज ग्राहकांच्या मध्ये वीज वापर आणि सुरक्षा याबाबत जागृती करण्यासाठी 1जून ते 6जून 2025पर्यंत वीज सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. अशी उपकार्यकारी अभियंता दयानंद आष्टेकर यांनी माहिती दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली आज आजऱ्याच्या मुख्य रस्त्यांवरून जनजागृती फेरी काढण्यात आली.

वीज सुरक्षा साप्ताहमध्ये प्रामुख्याने वीज सुरक्षिततेची आवश्यकता का आहे? ग्राहक जागृती, विजेचा वापर याबाबत वीज ग्राहकांना माहिती देऊन वीज ग्राहकांमध्ये जागरूकता आणणे हा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले. ग्राहक जागृतीमध्ये ग्राहकांचे हक्क, ग्रहकांच्या जबाबदाऱ्या यांचा समावेश होतो. वीज बिलात चूक झालेस दुरुस्ती मागण्याचा हक्क, मीटर चुकीचा असेल तर तो दुरुस्त करून घेण्याचा अधिकार, वीजबिल वेळेत भरणे, अनाधिकृत, बेकायदेशीर वीज वापर टाळणे, विजेचा अपव्यय टाळणे या वीज ग्राहकांच्या जबाबदाऱ्या आहेत.

वीज जपून वापरल्यास कोळसा, डिझेल, गॅस या नैसर्गिक साधन संपत्तींची बचत होईल त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल. यासाठी दिवसभर अघोषितपणे दूरदर्शन संच, पंखे, बल्ब इ. विजेची उपकरणे चालू ठेवणे टाळले पाहिजे. त्याचप्रमाणे विजेचे सुरक्षित वापर करून अपघात टाळले पाहिजेत. ज्यामध्ये ओल्या हाताने किंवा भिजल्या जागी विद्युत उपकरणे वापरू नये, तुटलेली तार, पोलवरील ठीणग्या -स्पर्किंग झालेस त्वरित महावीतरण कंपनीला कळविणे, परवाना धारक व अनुभवी विजतांत्रिकडूनच वीज जोडणी करून घेणे, लहान मुलांना विजेच्या बॉर्डपासून दूर ठेवणे. इ. कृतीतून वीज सुरक्षा करता येते अशा प्रकारची इतंभूत व आवश्यक माहिती असलेली भित्तीपत्रिका वाटून फेरी काढून माहिती देण्यात आली.

यावेळी दयानंद अष्टेकर (उपकार्यकारी अभियंता आजरा उपविभाग ), शरद पाटील, निखिल मोगरे, दीपक जमणे (शाखा अधीकारी 1,2,3आजरा ), सुनील देसाई (मानव संसाधन ), इम्रान अत्तरवाले (विजबिल विभाग )तसेच सर्व तांत्रिक कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Youtube लिंक👇

https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH

  • व्हॉट्सॲप चॅनल 👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

फेसबुक पेज लिंक 👇

https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL

लिंक मराठी वेबसाईट 👇

www.linkmarathi.com

वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.

📲 Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]

        *Follow Us*

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular