आजरा (हसन तकीलदार):
येणाऱ्या आजरा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर बाहेरील व वास्तव्यास नसलेल्या व्यक्तींची नोंद असल्याचा गंभीर आरोप आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने केला आहे. अशा मतदारांची नावे तात्काळ वगळावीत आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व न्याय्य राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे केली आहे.
नुकत्याच सुरू झालेल्या मतदार यादी पुनर्रचनेच्या कामात, समितीने स्वतःच्या स्तरावर माहिती घेतली असता, अनेक असे मतदार आढळून आलेत जे प्रत्यक्ष त्या प्रभागात वास्तव्यास नसून देखील मतदार यादीत नाव असल्यामुळे मतदानाचा हक्क बजावत आहेत. हे प्रकरण लोकशाही प्रक्रियेस गंभीर हानी पोचवणारे असल्याचे समितीचे मत आहे.
समितीच्या मते, अशा बोगस मतदारांमुळे स्थानिक मतदारांच्या संख्येवर प्रभाव पडतो व निवडणुकीचे निकाल विपरित दिशेने वळण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे, प्रत्येक मतदाराची पडताळणी करून प्रत्यक्ष वास्तव्यास नसलेल्या मतदारांना वगळण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, जर अशा मतदारांकडून बोगस मतदान आढळून आले, तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी विनंतीही केली आहे.

📝 ज्येष्ठ नागरिक व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या निवेदनप्रसंगी परशुराम बामणे (अध्यक्ष), गौरव देशपांडे (उपाध्यक्ष), पांडुरंग सावरतकर, विजय थोरवत, मिनिन डिसोझा, जावेद पठाण, बंडोपंत चव्हाण, सी. डी. सरदेसाई, वाय. बी. चव्हाण, जोतिबा आजगेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
Youtube लिंक👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH
- व्हॉट्सॲप चॅनल 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
फेसबुक पेज लिंक 👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
लिंक मराठी वेबसाईट 👇
www.linkmarathi.com
वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.
📲 Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]
*Follow Us*

मुख्यसंपादक