Homeघडामोडीआजरा साखर कारखान्याच्यावतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन

आजरा साखर कारखान्याच्यावतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन

आजरा (हसन तकीलदार):-वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि ;अमृतनगर गवसे तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे व महाराष्ट्र कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऊसपिक उत्पादन व सरासरी एकरी ऊस उत्पादन वाढीबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी शुक्रवार दि. 10/10/2025 रोजी सकाळी 11:00वाजता जनता सहकारी बँक लि;आजराच्या हॉल मध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आजरा साखर कारखान्याच्या ऊस विकास विभागामार्फत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती देऊन ऊस पीक उत्पादन वाढीबाबत मार्गदर्शन करण्याच्या हेतूने शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले असून या शेतकरी मेळाव्यामध्ये ऊस पीक वाढीसाठी टीश्यू कल्चर रोपांची, सेंद्रिय व रासायनिक खतांचा योग्य वापर, ठिबक सिंचनाच्या वापराचे फायदे अशा महत्वपूर्ण विषयावर ऊस पिकावरील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये कृषी विभागाचे सहसंचालक बसवराज मासोळी तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलक व डॉ. कपिल सुशीर त्याचप्रमाणे जिल्हा कृषी विभागाचे अधिकारी जालिंदर पांगरे, नामदेव परिट, किरण पाटील, भूषण पाटील आणि ग्रीनटेक प्रा. लि. चे अधिकारी विनय पोळ हे तज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत तरी सदर शेतकरी मेळाव्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव देसाई यांनी केले आहे.

📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)

🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!

व्हाट्सअप चॅनेल लिंक👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

युट्युब लिंक 👇

https://youtube.com/@linkmarathi-news?si=8CVnKR338XXteBA3

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular