आजरा (हसन तकीलदार ) :-आजरा शहरात सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यावतीने “हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” एक वर्षांपूर्वी चालू करण्यात आला होता पण या दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध नव्हते यामुळे रुग्णांना सेवा मिळत नव्हती.

शिवसेनेच्या वतीने अनेक वेळा निवेदने देऊन तसेच सतत पाठपुरावा केल्यामुळे या दवाखान्यात काही दिवसापूर्वी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली.दवाखान्यात हजर झालेल्या डॉ.मुबस्सीरा मॅमेल (एम. बी. बी. एस) यांचा शिवसेनेच्या वतीने युवराज पवार (तालुका प्रमुख )यांनी सत्कार केला आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने असलेल्या या दवाखान्यात गोरगरीब रुग्णांना चांगली व वेळेत सेवा मिळावी अशी सूचना करण्यात आली.

यावेळी आरोग्य विभागाचे आरोग्य विस्तार अधिकारी काटकर, कौस्तुभ पाटील,स्वप्निल कोगेकर, अधिपरिचारक, शाहीद मालदार (एम. पी.डब्ल्यू.)याचबरोबर शिवसेनेचे संजय सावंत(उपसरपंच देऊळवाडी) सुयश पाटील(युवा सेना उपतालुका प्रमुख),महादेव गुरव,विजय डोंगरे,सदानंद कदम आदिजण उपस्थित होते. या दवाखान्यात लिव्हर तपासणी,किडनी ,कोलेस्ट्रॉल, हिमोग्लोबिन ,शुगर इत्यादी तपासण्या होणार आहेत. तरी याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
🟢 दैनंदिन अपडेट्ससाठी खास निमंत्रण!
आपणास महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेची माहिती आणि इतर उपयोगी अपडेट्स दररोज मिळाव्यात, यासाठी आजच खालीलपैकी कोणत्याही पर्यायामध्ये सामील व्हा:
📌 WhatsApp Group – नियमित अपडेट्ससाठी
📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)
🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!
व्हाट्सअप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
व्हाट्सअप ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/KXy0XT9XJRpChVuADfr21r?mode=r_c

मुख्यसंपादक


