Homeआरोग्यपावसाळ्यात अन्न विषबाधा: कारणे आणि लक्षणे |Food poisoning in the monsoon: The...

पावसाळ्यात अन्न विषबाधा: कारणे आणि लक्षणे |Food poisoning in the monsoon: The causes and symptoms |

पावसाळ्यात अन्न विषबाधा:

पावसाळा सुरु झाला की अनेकांना विषबाधा होण्याची समस्या भेडसावते. अशा स्थितीत खाण्या – पिण्याची काळजी घेणं गरजेचं आहे. पावसाळ्यात वातावरण दमट होते. ज्यामुळे खाल्लेले अन्न लवकर पचत नाही, किंवा पचायला वेळ लागतो. इतर ऋतूच्या तुलनेत खवय्येवर्ग पावसाळ्यात अधिक प्रमाणात बाहेरचे पदार्थ खातात.
दिवसभरात आपण जे काही खातो, त्यातील काही पदार्थ पौष्टीक तर काही तब्यतीसाठी अपायकारक ठरू शकतात . ज्यामुळे उलटी, जुलाब, पोटदुखी या समस्या निर्माण होतात. अनेकदा अन्नातून विषबाधा देखील होते. अशा स्थितीत आरोग्याची काळजी कशी घ्यावी? अन्नातून विषबाधा झाल्यास काय करावे? असे प्रश्न निर्माण होतात(Food poisoning in the monsoon: The causes and symptoms).

पावसाळ्यात अन्न विषबाधा:
पावसाळ्यात अन्न विषबाधा:


फूड पॉईजनिंग म्हणजे काय?


यासंदर्भात, सर गंगाराम हॉस्पिटलचे इन्स्टिटय़ूट ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी अँड पॅनक्रियाटिक बिलीरी सायन्सचे सल्लागार डॉ. श्रीहरी अनिखिंडी सांगतात, ”बॅक्टेरिया, बुरशी किंवा इतर विषाणू अन्नात मिसळल्यानंतर विषबाधा निर्माण होते. हे अन्न आणि पेय आपल्या पोटात जातात, जे थेट आपल्या आतड्यांना नुकसान पोहचवते. यामुळे होणाऱ्या आजाराला फूड पॉईजनिंग असे म्हणतात.”

अन्नामध्ये संसर्ग का होतो?


पावसाळ्यात कच्च्या भाज्या किंवा इतर पदार्थांमध्ये जीवाणू वाढू लागतात. जर हे अन्न नीट शिजले नाही तर, त्यात विषाणू तसेच जिवंत राहतात. ज्यामुळे फूड पॉईजनिंगसारखी समस्या वाढते. साधारणपणे भाजी किंवा कोणतीही गोष्ट नीट शिजली तर बॅक्टेरिया मरतात. यामुळे अन्नातून विषबाधा होत नाही.

हे जीवाणू पोटात काय करतात?


डॉ.श्रीहरी अनिखिंडी यांच्या म्हणण्यानुसार, ”दूषित अन्न किंवा पाणी आपल्या पोटात गेल्यानंतर, अन्नातून बाहेर पडणारे जिवाणू झपाट्याने वाढू लागतात. हे बॅक्टेरिया आपल्या आतड्यात आधीपासूनच असलेल्या चांगल्या बॅक्टेरियांना मारायला लागतात. ज्यामुळे अन्न पचत नाही. आतड्यांमध्ये सूज निर्माण होते. ज्यामुळे अनेक आजार निर्माण होऊ शकतात.”


पावसाळ्यात अन्न विषबाधा:
पावसाळ्यात अन्न विषबाधा:

फूड पॉईजनिंगचे लक्षणं काय?


लूज मोशन, पोटदुखी आणि उलट्या ही अन्नातून होणाऱ्या विषबाधाची मुख्य लक्षणे आहेत. यासोबतच पोटदुखी, भूक न लागणे, मळमळ होणे आदी तक्रारीही दिसून येतात. परंतु, या लक्षणांसह लघवी कमी येणे, हात-पाय थंड होणे, अशक्तपणा येणे, अशा स्थितीत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं आहे.

अधिक माहिती

संदर्भ

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular