आजरा चंदगड हा विधानसभा मतदारसंघ शेतीप्रधान आहे. काजू व्यवसाय वगळता अन्य कोणाताही व्यवसाय महिला सक्षमीकरण व सबलीकरण होण्यासाठी कोणताही व्यवसाय नाही. याबाबत आजरा तालुक्यातील व चंदगड विधानसभा मतदारसंघातील कोळीद्रे जि. प. मधील महिलांनी महिलांच्या शाश्वत विकासासाठी सावित्रीबाई सेवा भावी संस्थेच्या नेतृत्वाखाली दि.२६/०८/२०२४ रोजी दौलत कारखाना साइटवर झालेल्या कार्यक्रमा मध्ये मा.मानसिंग खोराटे यांनी सर्व महिलांना संबोधले वेळी आपण वेगवेगळ्या उद्योगाच्या माध्यमातून महिला स्वतःच्या पायावर उभं राहाव्यात यासाठी नक्कीच प्रयत्नशील आहे. मतदार संघातील तरुणी – तरुणांसाठी नोकरी ,व्यवसाय व वेगवेगळे उद्योगधंद्यासाठी चालाना मिळावी . याकरिता लवकरच मतदारसंघात प्रत्येक गावात बेरोजगार तरुणांना नोकरी तसेच गरजूंना फक्त काम देणार, मी मात्र आशीर्वाद घेणार सुख समाधनासाठी, महिलांनी स्वत चे स्वता कमवणे,व स्वताच्या पायावर उभा राहणे. यासाठी यापूर्वी देखील १००० तरुणांना नोकरी देण्याचे काम केले आहे.त्यांच्या कार्यक्षेत्रात महिलांच्या व्यावसायिक स्वावलंबनासाठीही ठोस प्रयत्न केले जातील. असे म्हणाले. यावेळी सावित्रीबाई सेवा भावी संस्थेच्या वतीने राजकीय वाटचालीस पाठिंबा असल्याचे पत्र देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा जयश्री कांबळे, उपाध्यक्ष निता बोलके, सचिव अर्चना देसाई सदस्य ज्योती कांबळे, रेखा परिट, मुस्कान शेख, सरिता कांबळे सह शंभर हुन अधिक महिला संस्थेच्या व उपशाखेच्या प्रतिभा कोलेकर, सरिता बोलके, पूजा कांबळे, वृषाली देसाई, शुभांगी देसाई, शेवंता हुंदळेकर, अनिता सावंत, सरिता सावंत, आक्काताई कांबळे, अनुसया माणगावकर, कमल कांबळे अशा प्रमुख पदाधिकारी सदस्या उपस्थित होत्या
मुख्यसंपादक