अमित गुरव ( भादवण ) -: आज शाळा अगदी तुडुंब भरलेली होती . तसे शाळेत जेमतेम १३० विद्यार्धी पण पालकांचा उत्साह खूपच जाणवत होता. कारणही तसेच होते आज शाळा व्यवस्थापन समिती ( कमिटी ) स्थापन होणार होती. पण गावच्या राजकारणाची जोड शाळेला मिळाली त्यामुळे मीटिंग शाळेची होती की गावगाडा हाकणाऱ्या ग्रामपंचायतीची असा प्रश्न काही वेळ पडला. या कारणाने काही पालकांच्यांमधून मात्र नाराजीचे सूर उमटत होते आणि राजकारणाची पायताने शाळेत घालून आल्यानेच सगळे पालक गावाबाहेर मुले पाठवतात अशी उपस्थित लोकांच्यात कुजबूज सुरू झाली.
आदर्श विद्यामंदिर भादवण या शाळेच्या कमिटी अध्यक्ष साधना संजय केसरकर आणि उपाध्यक्ष निलेश गणपती सुतार यांची निवड करण्यात आली. तर काशिनाथ सुभाना कुंभार , ज्योती दतात्रय शिंदे , शैलेंद्र तुळशीराम मुळीक , कोमल रमेश केसरकर , रेणुका कमलाकर कामत, निलम हरीश देवरकर , सागर नारायण खुळे, सुनिता प्रकाश केसरकर , संदीप आनंदा सुतार हे शाळा कमिटी सदस्य झाले.
नवीन स्थापन झालेल्या कमिटी चे अभिनंदन पण त्यासोबतच त्यांनी बाहेर जाणारे विद्यार्थी थांबवून आपल्या गावात शाळा समृध्द कशी होईल याकडे डोळसपणे विचार होणे आवश्यक राहील. पण जर भविष्यात असेच शाळेत राजकारण येत राहिले तर आहे ती मुले सुद्धा एकेकाळी नावाजलेल्या या शाळेला मुकतील की काय अशी धास्ती गोरगरीब पालकांना वाटते.
यावेळी सर्व शिक्षक - शिक्षिका , पालक , मागील वर्षीचे कमिटी सदस्य , अध्यक्ष , उपाध्यक्ष तसेच पत्रकार अमित गुरव उपस्थित होते.
मुख्यसंपादक