Homeघडामोडीराजकीय हेतूने आपली कार्यकर्ते सांभाळण्यासाठी ठेक्यांची खैरात - परशुराम बामणे

राजकीय हेतूने आपली कार्यकर्ते सांभाळण्यासाठी ठेक्यांची खैरात – परशुराम बामणे

आजरा (हसन तकीलदार):- आजरा नगरपंचायतीतील सब ठेकेदारांना देण्यात येणाऱ्या कामांमुळे कामे रखडलेली आहेत. अनुभव शून्य लोकांना सब ठेका दिल्यामुळे कामाचा दर्जा खालवलेला आहे. दर्जाहीन आणि नियोजनशून्य कामामुळे जनतेचे हाल सुरू आहेत असे मत आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे यांनी मांडले.

आजरा नगरपंचायतमधील सध्याची प्रशासन व्यवस्था व कार्यपद्धती पाहता एक गंभीर प्रकार समोर येत आहे. काही नेते मंडळी आपल्या राजकीय फायद्यासाठी नगरपंचायत अधिकाऱ्यांवर दबाव टाकून आपल्या मर्जीतील व्यक्तींना जे या क्षेत्रातील अनुभवही नसणार्‍याना सब ठेकेदार म्हणून महत्वाची सार्वजनिक कामे देत आहेत.
अशा प्रकारे, पात्रता व अनुभवाचा विचार न करता केवळ राजकीय लाड पुरवण्यासाठी, आणि आपली कार्यकर्ते सांभाळण्यासाठी ही ठेक्याची कामे देण्यात येत असल्यामुळे ती कामे वेळेत पूर्ण होत नाहीत, दर्जाही घसरतो, आणि याचा थेट फटका सर्वसामान्य जनतेला बसतो आहे.

हे सर्व काही टक्केवारीसाठी की केवळ मतांसाठी सुरु आहे ? असा प्रश्न आजरा शहरातील सामान्य नागरिक विचारू लागले आहेत. लोकांचे मूलभूत प्रश्न,रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य, दिवाबत्ती या सर्व सुविधा यामुळे अर्धवट राहतात किंवा उशिरा मिळतात.यासाठीनगरपंचायतीने ठेके देताना खालील बाबींचा गांभीर्याने विचार करणे आवशक असल्याचे परशुराम बामणे यांनी म्हटले आहे.

  1. नगरपंचायतीत कामे देताना पारदर्शक प्रक्रिया राबवण्यात यावी.
  2. कामासाठी पात्रता, अनुभव आणि गुणवत्ता हेच निकष असावेत.
  3. अपात्र ठेकेदार व कामगारांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.
  4. नगरपंचायतीची कार्यपद्धती जनतेसमोर पारदर्शक करण्यात यावी.
    .काळ्या यादीतील ठेकेदारांना काम देऊ नये.
    शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा जनतेच्या हक्कासाठी आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे.

Youtube लिंक👇

https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH

  • व्हॉट्सॲप चॅनल 👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

फेसबुक पेज लिंक 👇

https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL

लिंक मराठी वेबसाईट 👇

www.linkmarathi.com

वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.

📲 Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]

        *Follow Us*

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular