Homeघडामोडीसाळगाव येथे व्यायामशाळा इमारत बांधकाम भूमिपूजन

साळगाव येथे व्यायामशाळा इमारत बांधकाम भूमिपूजन

आजरा – कोल्हापूर जिल्हा नियोजन समिती अंतर्गत क्रीडा विकास योजनेच्या माध्यमातून साळगाव (ता. आजरा) येथे उभारण्यात येणाऱ्या व्यायामशाळा इमारत बांधकामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. यावेळी माजी सैनिक विश्वास व्हळतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना लोकनियुक्त सरपंच धनंजय उर्फ भैय्या पाटील म्हणाले, राज्याचे आरोग्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून व जिल्हा बँक संचालक अर्जुन आबिटकर यांच्या सहकार्यातून कोल्हापूर जिल्हा नियोजन समिती मधून साळगाव गावामध्ये व्यायाम शाळा इमारत उभी करण्यासाठी सात लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. इमारत पूर्ण झाल्यानंतर पालकमंत्री आबिटकर यांच्या माध्यमातून व्यायामाचे साहित्य उपलब्ध करण्यात येईल. या माध्यमातून साळगाव मध्ये सशक्त व सुदृढ युवा पिढी तयार होण्यास हातभार लागणार आहे. याचबरोबर गावात सध्या समाज मंदिर बांधकाम, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती, नवीन गटार बांधणे यासह इतर कामे सुरू आहेत. आगामी काळात साळगाव गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रयत्नशील आहे. यावेळी उपसरपंच उषा नावलकर, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन कुंभार, बबन भंडारी, विजय कांबळे, कमल केसरकर, स्वप्नाली केसरकर, पूजा पाटील, श्रीधर जाधव, कृष्णा नार्वेकर, राजाराम कुंभार, बळीराम माडभगत, शशिकांत माडभगत, दत्तू कांबळे, ज्ञानदेव नावलकर, विष्णू केसरकर, पांडुरंग पाटील, सर्जेराव पाटील, कृष्णा गावडे, संजय माडभगत, बाळकृष्ण देवलकर, सचिन केसरकर, स्वप्निल दोरुगडे, सुहास शिपुरकर, सूर्यकांत माडभगत, गजानन पाटील, उत्तम जाधव, बबन वड्ड, दयानंद कांबळे, योगेश कांबळे, विनायक लोहार, भगवान पाटील, संदीप पाटील, गणपती कांबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. ग्रामसेविका कांचन चव्हाण यांनी आभार मानले.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular