HomeघडामोडीThe Kerala Story (द केरल स्टोरी)|सिनेमावरून प्रकाश राज यांची केंद्रावर टीका |prakash...

The Kerala Story (द केरल स्टोरी)|सिनेमावरून प्रकाश राज यांची केंद्रावर टीका |prakash raj on the kerala story

Prakash Raj On The Kerala Story Movie : द केरला स्टोरी सिनमावरून निर्माण झालेला वाद अजूनही कायम आहे. प्रकाश राज यांनी या सिनेमाच्या माध्यमातून केंद्र सरकावर टीका केली आहे.

मुंबई :

सुदीप्तो सेन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘द केरला स्टोरी’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई करत असून दिवसागणिक त्यामध्ये वाढ होत आहे. तसंच पश्चिम बंगाल सरकारनं या सिनेमावर घातलेली बंदी सुप्रीम कोर्टानं उठवली. सिनेमावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केंद्र सरकावर टीका केली आहे.

प्रकाश राज यांची पोस्ट


प्रकाश राज यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर द केरल स्टोरी सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. हे पोस्टर शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, ‘ प्रिय सुप्रीम लीडर, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी काल्पनिक प्रपोगांडा असलेल्या या सिनमाचं प्रमोशन करून त्याचा वापर करण्यामागे तुमचा नेमका काय विचार होता? ‘ पोस्टच्या शेवटी त्यांनी #Just Asking हा हॅशटॅग वापरला आहे. प्रकाश राज यांनी शेअर केलेल्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सुप्रीम कोर्टाचा केला उल्लेख

प्रकाश राज यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पश्चिम बंगलामध्ये सिनेमावर घालतलेली बंदी सुप्रीम कोर्टानं उठवल्याच्या आदेशाचा उल्लेख केला आहे. कोर्टानं त्यांच्या आदेशामध्ये असं म्हटलं होतं की निर्मात्यांनी सिनेमाच्या सुरुवातीला निवेदन सादर करावं ज्यात या सिनेमात जे काही दाखलं आहे ते सत्य घटनेवर आधारीत नाही. त्याशिवाय यात केरळमध्ये हजारो महिला कट्टरपंथी दाखवलं आहेत, त्याचे काही पुरावे नाहीत. परंतु या आदेशाचं पालन निर्मात्यांनी केलेलं नाही.

का होत आहे केरल स्टोरी सिनेमावर वाद

केरला स्टोरी सिनेमाचं कथानक तीन मुलींवर आधारीत आहे. त्यांचं ब्रेन वॉश करून धर्म परिवर्तन केलं जातं आणि त्यानंतर त्यांना दहशतवादी संघठना आयएसआयएसमध्ये जबरदस्तीनं भरती केलं जातं. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच त्याला विरोध होत आहेत. काही टीकाकारांच्या मते या सिनेमाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समुदायाला लक्ष्य केलं जात आहे.

‘the kerala story’

सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हा सिनेमा पहिल्या दिवसापासूनच कोटींची कमाई करत आहे. या सिनेमानं १५ दिवसांत १७१.७२ कोटींची कमाई केली आहे.

चालू घडामोडी वाचण्या साठी किलीक करा

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular