आजरा/प्रतिनिधी
बीरेश्वर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी या संस्थेच्या आजरा शाखेला महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री नामदार प्रकाशराव आबिटकर यांनी सदिच्छा भेट दिली. माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व माजी मंत्री विद्यमान आमदार शशिकलाताई जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक व गोव्यामध्ये संस्थेच्या २२६ शाखा उत्कृष्ट पद्धतीने सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
संस्थेचे शाखा अध्यक्ष ज्योतिप्रसाद सावंत यांच्या हस्ते मंत्री आबिटकर यांचा सत्कार करण्यात आला. आग्रा शाखेने वर्षभरातच सात कोटींचा ठेवींचा टप्पा ओलांडला असल्याचे अध्यक्ष सावंत यांनी सांगितले.
कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संचालक महेश कुरूणकर, तानाजी तानाजी डोणकर, अनिकेत शिंत्रे, सुरेश मिटके, सुशांत निकम, अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी, उद्योजक महादेव पोवार, विजय थोरवत, राजेंद्रभाऊ सावंत, नाथा देसाई, समीर मोरजकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
शाखा व्यवस्थापक दत्तात्रय सुतार यांनी आभार मानले.

मुख्यसंपादक