Homeबिझनेसभारतात पर्सनल लोन ( Parsonal Lone ) ला प्रचंड मागणी . कोणत्या...

भारतात पर्सनल लोन ( Parsonal Lone ) ला प्रचंड मागणी . कोणत्या बँक देतात स्वस्तात कर्ज ?

देशात सणासुदीच्या हंगामात कर्जाच्या मागणीत प्रचंड वाढ होत असते. हल्ली लोकं विविध गोष्टी खरेदी करण्यासाठी लोनचा पर्याय निवडताना दिसतात. मोबाइल, घरातील लहान-मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपासून अनेक गोष्टी लोनवर खरेदी करतात. इतकंच नाही तर आता अनेक ऑनलाइन वेबसाइटवर महागडे कपडेही इएमआयवर खरेदी करण्याचा ऑप्शन दिला जातो. यांसारख्या अनेक कारणांमुळे आता गूगल ट्रेंड्सवरही पसर्नल लोन कीवर्ड ट्रेंड होताना दिसतोय, म्हणजेच काय तर लोक गूगलवर पर्सनल लोनसंदर्भात अधिक सर्च करत आहेत. याच कारणामुळे पर्सनल लोन हा शब्द आता गूगलवर सर्वाधिक सर्च झालेला कीवर्ड ठरला आहे.

महागाईच्या जगात प्रत्येकाला कधी ना कधी पैशांची गरज भासते. अशावेळी लोक पर्सनल लोन घेण्याचा विचार करतात. काहीवेळा ते अशा ठिकाणाहून लोन घेतात, जिथे त्यांना खूप व्याज द्यावे लागते, त्यामुळे आर्थिक स्थिती कोलमडते. कर्जाची रक्कम, व्याज आणि इतर आर्थिक व्यवहाराने आर्थिक घडी नीट बसत नाही, त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी बराच वेळ जातो. अशावेळी बचतीसाठी एक रुपयादेखील शिल्लक राहत नाही. अशा परिस्थितीत लोक वेगवेगळ्या बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांची (NBFC) तुलना करून सर्वात कमी व्याजदरात कर्ज मिळावे यासाठी प्रयत्न करतात.

सर्वात स्वस्तात पर्सनल लोन ( Parsonal Lone ) कुठे मिळते?

सर्वात स्वस्तात पर्सनल लोनसाठी लोक गूगल सर्चमध्ये प्रामुख्याने पिरामल कॅपिटल अँड हाउसिंग फायनान्स, डीएमआय फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, टाटा कॅपिटल आणि युनिटी बँक यांसारखी नावे सर्च करताना दिसतात. याशिवाय सरकारी बँकांमध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) प्री-अप्रूव्ड लोनची सर्वात जास्त चर्चा आहे, त्यामुळे कोणत्या मोठ्या बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या पर्सनल लोनवर काय व्याजदर आकारतात, कोणत्या बँका किंवा वित्तीय संस्था कमी व्याजदरात लोन उपलब्ध करून देतात, याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊ…

पिरामल फायनान्स पर्सनल लोन

पिरामल फायनान्सकडून ग्राहकाेना सहज पर्सनल लोनची सुविधा दिली जाते. अगदी कमी कागदपत्रांमध्ये सहज हे लोन उपलब्ध करून दिले जाते. पिरामल फायनान्सकडून फक्त १२.९९% वार्षिक व्याजदरापासून पर्सनल लोनची सुविधा दिली जाते. कंपनी ग्राहकांना जास्तीत जास्त १० लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन देते. पण, लोन फेडण्यासाठी कमाल पाच वर्षांचा कालावधी दिला जातो.

डीएमआय फायनान्स पर्सनल लोन

डीएमआय फायनान्स १२ टक्के वार्षिक व्याजदराने ग्राहकांना पर्सनल लोन ऑफर करते. तुम्हाला पर्सनल लोनची रक्कम फेडण्यासाठी कमाल पाच वर्षांचा कालावधी दिला जातो. विशेष बाब म्हणजे डीएमआय फायनान्सची संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आणि कोणत्याही कागदपत्रांशिवाय आहे. ग्राहकांना हे लोन त्यांच्या पार्टनर कंपन्यांमार्फत दिले जाते.

टाटा कॅपिटल पर्सनल लोन

ग्राहकांना टाटा कॅपिटल लिमिटेडकडून वर्षाला १०.९९ टक्के व्याजदराने पर्सनल लोन घेता येऊ शकते. ग्राहक ५० लाखांपर्यंतच्या पर्सनल लोनसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. याशिवाय टाटा कॅपिटल तुम्हाला इन्स्टंट लोनचीदेखील ऑफर देतात.

युनिटी स्मॉल फायनान्स बँक

युनिटी स्मॉल फायनान्स बँक ग्राहकांना वार्षिक १२ टक्के दराने १० लाखांपर्यंत पर्सनल लोन देते. तुम्ही तीन वर्षांच्या कालावधीत या कर्जाची परतफेड करू शकता.

कोटक महिंद्रा बँक

कोटक महिंद्रा बँकेकडून ग्राहकांना वर्षाला १०.९९ टक्के व्याजदराने ४० लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन दिले जाते, हे लोन तुम्ही सहा वर्षांच्या कालावधीत फेडू शकता.

पंजाब नॅशनल बँक

पंजाब नॅशनल बँक (PNB) भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक आहे. या बँकेकडून ग्राहकांना २० लाखांपर्यंतचे पर्सनल लोन दिले जाते. कमी व्याजदरात आणि कमी कागदपत्रांवर तुम्ही हे लोन घेऊ शकता.

घराचे नूतनीकरण, प्रवास, लग्नकार्य व वैद्यकीय कारणांसाठी पीएनबी बँकेचे पर्सनल लोन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. एवढेच नाही तर तुम्ही पेन्शनर असलात तरी या कर्जाचा लाभ घेऊ शकता. तुम्ही PNB वेबसाइटला भेट देत तुमचा कस्टमर आयडी, बँक अकाउंट नंबर, आधार कार्ड नंबर टाकून कर्ज घेण्यासाठी पात्र आहात का हे तपासू शकता.

पर्सनल लोनवर वर्षाला फक्त १०.४० टक्के व्याजदर भरावे लागते. तुम्हाला या कर्जाची परतफेड सात वर्षांच्या कालावधीत करावी लागते. जर तुम्ही निवृत्तीवेतनधारक असाल, तर तुम्हाला आणखी कमी व्याजदराने पाच वर्षांसाठी कर्ज मिळू शकते.

सरकारी बँकेकडून कमी व्याजदरात मिळवा पर्सनल लोन

कर्ज घेण्यापूर्वी व्याजदर आणि अटींची तुलना करणे फार महत्त्वाचे आहे. सरकारी बँका साधारणपणे कमी व्याज आकारतात, पण तिथून कर्ज मिळणे थोडे कठीण असते. त्याच वेळी बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFC) त्वरीत कर्ज देण्याचा दावा करतात, परंतु त्यांचे व्याजदर जास्त आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँका अनेकदा कमी व्याजदराने कर्ज देतात, कारण त्यांचे निमय कठोर आणि अधिक स्थिर असतात, ज्यामुळे डीफॉल्ट धोका कमी होतो.

याउलट बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFC) जास्त व्याजदर आकारतात, त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा विचार करणे हा तुमच्यासाठी परवडणारा पर्याय असू शकतो.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular