Homeघडामोडीटोल नाका तालुक्याबाहेर न्या अथवा तालुक्याला टोलपासून मुक्ती द्या - शिवसेना...

टोल नाका तालुक्याबाहेर न्या अथवा तालुक्याला टोलपासून मुक्ती द्या – शिवसेना ( उबाठा गट )

आजरा (हसन तकीलदार):-संकेश्वर बांदा महामार्ग आजऱ्याच्या जनतेसाठी सोयीचे कमी पण डोकेदुखी जास्त ठरले आहे. रस्त्यावरील पाण्याचा निचरा योग्य होत नाही, पूर्वी इतकाच रस्ता, गटारिंची व्यवस्था चुकीची, महामार्गाचे कोणतेही निकष पूर्ण न करता आजरेकरावर टोलची टांगती तलवार मात्र कायम ठेवली आहे. यासाठी शिवसेना उबाठा तर्फे संकेश्वर बांदा महामार्गावरील आजरा एम. आय. डी. सी. जवळ बसवलेला टोल नाका तालुक्याबाहेर तरी न्या अथवा संपूर्ण तालुक्याला टोलपासून मुक्ती द्या अशा आशयाचे निवेदन आजरा तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले आहे.


मागील दीड वर्षापासून संकेश्वर बांदा महामार्गावरील एम. आय. डी. सी. जवळ उभारलेल्या टोलनक्याविरोधात सर्वपक्षीय संघटना “टोल मुक्ती संघर्ष समितीच्या बॅनरखाली एकत्र येत निवेदने, मोर्चे, आंदोलने करीत लढा देत आहेत. परंतु यावर तोडगा निघण्याअगोदरच प्रिंट माध्यमातून टोल चालुची बातमी देऊन अचानक टोल सुरु करणार हे समजल्यानंतर टोल विरोधी संघर्ष समितीने मोर्चा काढला यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे मार्फत कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री आबिटकर, जिल्हाधिकारी व तालुक्यातील नागरिक यांची पुढील बैठक होईपर्यंत टोलला स्थगिती दिली आहे. परंतु ही तात्पुरती स्थगिती देऊन लोकांच्यावर होणारा अन्याय दूर होणार नाही. यासाठी कायमस्वरूपी आजरेकरांना टोलपासून मुक्ती मिळावी यासाठी हा टोल नाका आजरा तालुक्याचे शेवटचे गाव कीटवडे येथे हलवीण्यात यावे. यामुळे टोल वसुलीही चालू राहील व आजरेकरांची टोल मधून सुटका होईल असे निवेदनात नमूद करीत पुढे म्हटले आहे की, शिवसेनेच्या वतीने 4 एप्रिल 2024 रोजी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग यांना टोल नाका किटवडे येथे हलविणेबाबत निवेदन दिलेले होते त्यामुळे या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनावर शिवसेना उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील व तालुका प्रमुख युवराज पोवार यांच्या सह्या आहेत.

📢 अपडेट्स मिळवा – फक्त “लिंक मराठी” वर!

📲 आजच फॉलो करा आणि रहा अपडेटेड!

📺 यूट्यूब चॅनेल: 👉

https://youtube.com/@linkmarathi-news?si=esDLx1PYMWMRWxXk

📘 फेसबुक पेज:👇

https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL

💬 Follow the Link Marathi channel on WhatsApp: 👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

🌐 वेबसाईट:

www.linkmarathi.com

🗣️ स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज आणि सत्य परिस्थिती – आता तुमच्या मोबाईलवर!

📌 “लिंक मराठी” – जे मराठी बोलतं, मराठी जगतं!

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular