Homeघडामोडीचंदगड आजरा गडहिंग्लज मधील १६७ गणेश मंडळांना भेटी देण्याचे भाग्य मला लाभले...

चंदगड आजरा गडहिंग्लज मधील १६७ गणेश मंडळांना भेटी देण्याचे भाग्य मला लाभले – मानसिंग खोराटे

चंदगड: ( प्रतिनिधी ) -: गणेश उत्सवानिमित्त गावागावांमध्ये गणपती विराजमान झालेले आहेत त्याअनुषंगाने मानसिंग खोराटे यांनी 7 दिवसातच चंदगड-आजरा-गडहिंग्लज गावातील जवळपास 167 गणेश मंडळांना भेट देऊन त्यांनी काम करण्याची पद्धत, नियोजन आणि कार्यशैली इतरांपेक्षा का प्रभावशाली आहे याची प्रचितीच जणू लोकांना अनुभवायला मिळाली. त्यांनी आपल्या भेटीदरम्यान त्यांच्या कार्यक्षमतेने आणि परिश्रमाने चंदगड आणि परिसरातील सामाजिक आणि विकासात्मक कार्यांमध्ये सहभाग घेऊन चंदगड विधानसभेच्या येणाऱ्या निवडणुकीत आपली छाप पाडून एक नवा रंग भरला आहे. सदर भेटीदरम्यान खोराटे यांनी मतदारसंघातील विविध समस्या, सामाजिक प्रश्न आणि मूलभूत असणाऱ्या गरजा यासंबंधी विकासात्मक विचार मांडले.
चंदगड-आजरा-गडहिंग्लज युवकांसाठी आपल्या भागातच उद्योगक्षेत्रातील प्रबळ अनुभवाच्या बळावर नवीन उद्योगांसाठी परकीय गुंतवणूक आणून विकासात्मक औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.त्यासाठी युवकांनी देखील विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागीव्हावे यासाठी प्रोत्साहित केले आणि कौशल्यवृद्धीवर चर्चा केली, ज्यामुळे नवीन संधी सहज उपलब्ध होऊ शकते. तसेच भागात भरपूर पाऊस होऊन देखील चंदगड विधानसभेचा काही भाग हा पाण्यापासून वंचित आहे त्यामुळे वंचित भागाच्या शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नक्कीच कायमस्वरूपी मार्गी लावणार असल्याचे त्यांनी भेटीदरम्यान नमूद केले.


त्याचप्रमाणे खोराटे यांनी सांगितले की आपल्या भागातच पर्यटन व्यवसायाला भरपूर वाव असून त्याला चालना मिळावी यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली, तसेच चंदगडच्या लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून तालुक्यात अत्याधुनिक सर्वसोयी व समृद्ध हॉस्पिटल होणे गरजेचे असून ते नक्कीच उभारणार याची शाश्वती त्यांनी लोकांना दिली.

मानसिंग खोराटे यांच्या सृजनात्मक आणि विकासात्मक दृष्टिकोनामुळे चंदगडमधील सर्वांगीण विकासाची दिशा स्पष्ट झाली आहे आणि येथील लोकांना उज्वल भविष्य घडवण्यासाठी एक नवा विश्वास प्राप्त झाला आहे असे मत त्यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सदर भेटीदरम्यान त्यांच्यासोबत श्री संतोष मळविकर, श्री पृथ्वीराज खोराटे, श्री बी एम पाटील, श्री बाळासाहेब हाळदणकर, श्री राजवर्धन शिंदे-सांबरेकर, श्री जगन्नाथ हुलजी, श्री बाळाराम फडके श्री अरुण गवळी, श्री बसवराज आरभोळे श्री शशिकांत रेडेकर, श्री बाजीराव देवलकर, श्री नरसू शिंदे ,श्री प्रभाकर कोरवी व सर्व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular