Homeघडामोडीचोरी दरोड्याच्या घटनेत चोर होणार तत्काळ जेरबंद - संचालक ग्राम सुरक्षा यंत्रणा....

चोरी दरोड्याच्या घटनेत चोर होणार तत्काळ जेरबंद – संचालक ग्राम सुरक्षा यंत्रणा. ग्राम सुरक्षा यंत्रणेची उद्दिष्ट , वैशिष्ट्य काय…? पहा link marathi वर

पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर 18002703600/9822112281 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जाणार असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी.के.गोर्डे-पाटील यांनी नागरिकांना यंत्रणेचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दाखवले. पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी यंत्रणेत पुढील 48 तासांत सहभागी होण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संयोजन नागेश यमगर सहाय्यक पोलीस निरीक्षक आजरा पोलीस स्टेशन यांनी केले.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो,त्यामुळे सर्वांनी ग्राम सुरक्षा प्रभावी वापर करावा – समीर माने तहसीलदार आजरा

अतिशय महत्वपूर्ण यंत्रणा गावामध्ये अलर्ट राहून यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करावा. आपलं गाव सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आपलं गाव आपली जबाबदारी – नागेश यमगर सहाय्यक पोलीस निरीक्षक आजरा पोलीस स्टेशन

तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीनी ग्राम सुरक्षा यंत्रणा सुरू करून यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करावा.आपत्कालीन व्यवस्थेसह महत्त्वाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत एकाच वेळी पोहोचवण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा महत्वाची आहे – संजय ढमाळ गटविकास अधिकारी आजरा यांची मनोगते झाली.

ग्राम सुरक्षा यंत्रणा पोलीस स्टेशन हद्दीत कार्यान्वित करण्यासाठी 50 रुपये प्रति कुटुंब,प्रति वर्ष इतका खर्च येणार आहे. सदर खर्चाची 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून तरतूद करणेबाबतचे निर्देश जिल्हा परिषद कार्यालयाकडून ग्रामपंचायतींना देण्यात आलेले आहेत.

गेल्या 14 वर्षांत पुणे,सोलापूर, अहमदनगर,धाराशिव,छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 6500 हून अधिक गावे व ग्रामीण पोलीस स्टेशन ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाले आहेत.ग्रामस्थ आपापले मोबाईल नंबर नोंदवून यंत्रणा वापरत आहेत. संपूर्ण भारतासाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर 18002703600/9822112281 वर नोंदणी केलेल्या नागरिकाने आपत्ती काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईलवर ऐकू जातो. परिसरातील नागरिकांना घटनां घडत असतांनाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते.

ग्राम सुरक्षा यंत्रणेची उद्दिष्ट


घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळणे.
गावातील कार्यक्रम / घटना विना विलंब नागरीक/ ग्रामस्थांना एकाच वेळी कळवणे.
अफवांना आळा घालणे.
प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणे.
पोलीस यंत्रणेस कायदा व सुव्यस्था कायम राखणे कामी नागरिकांचे सहकार्य मिळणे.

ग्राम सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये


संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा
गावासाठी यंत्रणा सुरु करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पद्धत
संपूर्ण भारतासाठी एकच टोलफ्री नंबर 18002703600/9822112281
यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतो.
संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरुपात परिसरातील नागरिकांना मिळतो.
दुर्घटनेचे स्वरूप, तीव्रता , ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विना विलंब व नियोजनबद्ध मदत करता येते.
नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलित रित्या प्रसारित होतात
नियमाबाह्य दिलेले संदेश/ अपूर्ण संदेश रद्द होतात व प्रसारित होत नाहीत.
एका गावात चोरी करून चोर दुसऱ्या गावच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य.
वाहन चोरीचा संदेश आजूबाजूच्या 10 किमी परिसरातील सर्व दिशांच्या गावांना तत्काळ मिळतो.
घटनेच्या तीव्रतेनुसार कॉल रिसीव्ह होत नाही,तोपर्यंत रिंग वाजते.
संदेश पुढील 1 तास पुन्हा पुन्हा ऐकण्याची सोय. कोणत्याही वेळी आपल्यासाठी संदेश तपासण्याची सोय.
चुकीचा संदेश किंवा मिस कॉल देणारे नंबर आपोआप Black List होतात.
गावाबाहेर दुसऱ्या गावात अपघातग्रस्त नागरिकाचा संदेश घटना घडलेल्या परिसरातही प्रसारित होतात.
सरकारी कार्यालये / पोलीस स्टेशन आदींना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना किंवा विशिष्ट एक किंवा एकापेक्षा जास्त गावांना किंवा कर्मचाऱ्यांना सूचना / आदेश देता येणे शक्य.

सदर कार्यक्रमास BDO ( बीडिओ) संजय ठमाल, PSI संजय पाटील, नायब तहसीलदार माळसाकांत देसाई, गणेश लोकरे वरिष्ठ विभागीय अधिकारी ग्राम सुरक्षा यंत्रणा, विक्रमसिंह घाटगे जिल्हा समन्वयक ग्राम सुरक्षा यंत्रणा, गोपनीय अंमलदार आनंदा देसाई , यांच्यासह आजरा पोलीस स्टेशनचे अंमलदार व हद्दीतील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, मंडलाधिकारी, तहसील ऑफिस सर्व अधिकारी-कर्मचारी, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, पत्रकार ,आशा सेविका,अंगणवाडी सेविका, तलाठी कोतवाल, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य सेविका,आरोग्य अधिकारी-कर्मचारी, व्यापारी, पोलीस मित्र व सहकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular