Homeघडामोडीव्यंकटराव प्रशालेची विद्यार्थिनी सौश्रुती पुंडपळ 'एम.पी.एस.पी.'परीक्षेत राज्यात प्रथम

व्यंकटराव प्रशालेची विद्यार्थिनी सौश्रुती पुंडपळ ‘एम.पी.एस.पी.’परीक्षेत राज्यात प्रथम

आजरा :- प्रतिनिधी.

आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ‘एम.पी.एस.पी.’या शालेय स्पर्धा परीक्षेत सुयश संपादन केले. प्रशालेची विद्यार्थिनी कु. सौश्रुती अमित पुंडपळ या विद्यार्थिनीने ‘एम.पी.एस.पी’ परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.
या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे:
श्रुती पुंडपळ (२८४ गुण ) राज्यात प्रथम, विवेक पाटील (२८० गुण ) राज्यात तिसरा, विभावरी जावळे ( २६८ गुण ) राज्यात चौथी, स्वराज प्रवीण निंबाळकर (२५४ गुण) राज्यात २१ वा, संस्कृती इलगे ( २४४ गुण) राज्यात ४१ वी, अर्णव जाधव (२४० गुण) राज्यात ४९ वा) संस्कार तेजम (२३६ गुण) राज्यात ५८ वा, कार्ति दळवी ( २२४ गुण ) राज्यात ९५ वा
वरील सर्व यशस्वी विध्यार्थ्यांना विषय शिक्षक पी. एस. गुरव श्रीमती ए .बी.पुंडपळ श्रीमती एस.के.कुंभार, व्ही.ए.चौगले यांचे मार्गदर्शन मिळाले.
प्राचार्य आर.जी.कुंभार सर पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार मॅडम यांचे प्रोत्साहन लाभले.
आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे चेअरमन जयवंत शिंपी व सर्व संचालक मंडळाची प्रेरणा मिळाली.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular