Homeघडामोडीश्री रवळनाथ प्राथमिक विद्या मंदिरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

श्री रवळनाथ प्राथमिक विद्या मंदिरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा


आजरा (हसन तकीलदार ):-जनता एज्युकेशन सोसायटी संचलित श्री रवळनाथ प्राथमिक विद्या मंदिर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. बदलत्या जीवन शैलीमुळे जीवनात योगाला अनन्य साधारण महत्व आले आहे. त्यामुळे योगाला जग मान्यता मिळाली आहे. यासाठीच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो.


श्री रवळनाथ प्राथमिक विद्या मंदिरातील शिक्षक सूरज बिद्रे यांनी योगदिनाचे महत्व सांगताना म्हणाले कि, योगामुळे आपण निरोगी व सदृढ राहू शकतो. जीवनातील तणाव कमी करण्यासाठी योग अत्यंत उपयुक्त आहे.


शाळेतील ज्येष्ठ अध्यापिका निलांबरी कामत यांनी विद्यार्थ्यांना विविध आसनांची प्रात्यक्षिके करून दाखवली व त्याप्रमाणे ती विद्यार्थ्याकडून करून घेतली.

या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. तर शिक्षिका विजया पोतदार, रविना घेवडे, पूजा लाड त्याचप्रमाणे पांडुरंग धडाम यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा कुराडे यांनी केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवित उत्साहाने सर्व प्रात्यक्षिके केली.

🌿 आपल्या मातीशी नाळ जुळलेली, आपल्या लोकांच्या हक्काची व्यासपीठ – Link Marathi 🌿

तुमची गोष्ट, तुमच्याच भाषेत सांगणं हीच आमची जबाबदारी आहे.

🫱 तुमचा पाठिंबा , आमची ताकद!

Youtube लिंक👇

https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH

  • व्हॉट्सॲप चॅनल 👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

फेसबुक पेज लिंक 👇

https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL

लिंक मराठी वेबसाईट 👇

www.linkmarathi.com

वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.

📲 Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]

        *Follow Us*
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular