चंदगड (प्रतिनिधी): चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा, कर्मचारी, औषध पुरवठा व इमारतीच्या स्थितीचा आढावा आमदार शिवाजी पाटील यांच्या कडुन घेण्यात आला. पाहणीदरम्यान रुग्णालयाची इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचे दिसून आले.
रुग्णालयाच्या बाथरूम्सना दरवाजे नाहीत, विजेचे दिवे व पाण्याची सोय अपुरी आहे, तर इमारतीच्या आजूबाजूला गवत आणि झाडझुडपे प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. अनेक ठिकाणी इमारत गळत असल्याचे निदर्शनास आले. पावसाळ्यात ही स्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या परिस्थितीतही रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शासनाच्या दुर्लक्षामुळे रुग्ण व आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने दुरुस्तीचे आदेश पाटील यांनी दिले.
तसेच रुग्णालयातील रुग्णांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या. यावेळी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते.
🌿 आपल्या मातीशी नाळ जुळलेली, आपल्या लोकांच्या हक्काची व्यासपीठ – Link Marathi 🌿
तुमची गोष्ट, तुमच्याच भाषेत सांगणं हीच आमची जबाबदारी आहे.
🫱 तुमचा पाठिंबा , आमची ताकद!
Youtube लिंक👇
https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH
- व्हॉट्सॲप चॅनल 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
फेसबुक पेज लिंक 👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
लिंक मराठी वेबसाईट 👇
www.linkmarathi.com
वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.
📲 Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]
*Follow Us*

मुख्यसंपादक