Homeघडामोडीजवाहर पत संस्थेची 54वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

जवाहर पत संस्थेची 54वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

आजरा(हसन तकीलदार):-आजऱ्यातील सर्वात जुनी पतसंस्था म्हणून ओळख असलेल्या जवाहर नागरी सहकारी पत संस्थेची 54वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या पैगंबरवासी सुलेमानशेठ दिडबाग सभागृहात नुकतीच खेळीमेळीत पार पडली. आजरा येथील मुस्लिम समाजाची अर्थवाहिनी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या संस्थेला अहवाल सालात 29लाखाचा नफा झाला असल्याचे संस्थेचे अध्यक्ष इकबाल इब्राहिम शेख यांनी संगितले.


यावेळी अहवाल वाचन संस्थेचे व्यवस्थापक बशीरअहमद काकतिकर यांनी केले. तर संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना संचालक समीर चांद (सर)म्हणाले की, अहवाल सालात संस्थेच्या ठेवीमध्ये वाढ होऊन गतवर्षी संस्थेची उलाढाल 14कोटींच्या आसपास आहे. सभासदांना 10% लाभांश देण्याचा निर्णय यावेळी घेणेत आलेला आहे. संस्था स्थापनेपासून ते आजतागायत सर्वात जास्त नफा व वार्षिक उलाढाल झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


यावेळी काही सभासदांनी प्रश्न विचारत सूचना मांडल्या. कैय्युम बुडडेखान यांनी नातेवाईकांची कर्ज वसुली प्रधान्याने करणेबाबत सूचना मांडली. देवदास पाचवडेकर यांनी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन पात्र कर्मचारी भरती तातडीने करावी असे सांगितले. मुनीर बुडडेखान यांनी पिग्मी कलेक्शन वाढण्याच्या व उत्तम जाधव यांनी लाभांश मध्ये वाढ करावी असे मत मांडले. चोख, प्रगतशील व पारदर्शक कारभाराबद्दल अमानुल्ला आगलावे यांनी संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याचप्रमाणे संस्थेचे कार्यक्षेत्र आजरा शहरांपुरते मर्यादित वरून कोल्हापूर जिल्हा करण्याचा ठराव देखील मांडण्यात आला व त्यास मंजुरी घेण्यात आली. अहवाल सालात दिवंगत झालेले संस्थेचे सभासद, नातेवाईक, ठेवीदार तसेच सामाजिक राजकीय नेते, शहीद जवान आदींना श्रद्धांजलीचा ठराव असिफ दरवाजकर यांनी मांडला. आभार संचालक तौसिफ आगा यांनी मानले. यावेळी असिफ सोनेखान, असलम लमतुरे, इलियास तकीलदार, इस्माईल बेपारी (सर), सौ. शबनम मुल्ला, सौ. रुखसाना नसरदी व सभासद उपस्थित होते.

📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा
(📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)

🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत!

व्हाट्सअप चॅनेल लिंक👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular