Homeघडामोडीविद्यामंदिर नरेवाडी शाळेत नवागतांचे स्वागत.

विद्यामंदिर नरेवाडी शाळेत नवागतांचे स्वागत.

(शैलेश मगदूम ):विद्या मंदिर नरेवाडी शाळेत इयत्ता पहिलीच्या मुलांना पुस्तके, फुगे,लेखन साहित्य व खाऊ वाटप करून पुष्प देऊन त्यांचे शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. सुरुवातीला भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका क्रांती देवी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व मुलांना पुस्तके व खाऊ वाटप करण्यात आले.शालेय पोषण आहारात पहिल्या दिवशी मुलांना श्री गणेशा महिला बचत गटामार्फत गोड शिरा देण्यात आला.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा आदरणीय डॉक्टर शीतल पवार, तसेच उपाध्यक्ष आदरणीय राजाराम कुंभार,सदस्या मीनाक्षी रणदिवे, दीपक केसरकर, वैभव पाटील, विश्वनाथ कदम,अंगणवाडी सेविका,बचत गटाच्या सचिव संगीता कोकितकर व इतर सदस्य उपस्थित होते. अध्यापक आदरणीय किरण गुडशी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले तर मुख्याध्यापक सुनील सुरंगे यांनी आभार मानले.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular