आजरा (हसन तकीलदार ):-शासन आदेशाप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील जिल्हापरिषद व पंचायत समिती सदस्य संख्या व मतदार संघ रचना करणेबाबतचे शासन आदेश झाले आहेत. राज्याच्या 32 जिल्ह्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्या निश्चित केली आहे. परंतु एकमेव आजरा तालुक्यावर ही सदस्य निश्चित करतेवेळी अन्याय झालेला आहे. प्रत्येक जिल्ह्याबाबत कमी लोकसंख्येच्या तालुक्यात काही ठिकाणी 3ते 4तर काही ठिकाणी 6सदस्य संख्या शासनाने तत्वतः निश्चित केली आहे. परंतु आजरा तालुक्याची लोकसंख्या नगरपंचायत वगळून 1,02,956इतकी असून देखील 2 जिल्हापरिषद व 4 पंचायत समिती सदस्य संख्या निश्चित करून पूर्वीच्या 3जिल्हापरिषद व 6पंचायत समिती सदस्य संख्येतून 1जिल्हा परिषद व 2पंचायत समिती सदस्य संख्या कमी करून तालुक्यावर अन्याय केला आहे.
शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे आजरा तालुक्याला 4जिल्हा परिषद व 8पंचायत समिती सदस्य संख्या असणे शासन आदेशाने गरजेचे आहे. परंतु 4 व 8 सदस्य संख्येऐवजी पूर्वीची 1 व 2 कमी करून 2जिल्हा परिषद व 4 पंचायत समिती सदस्य संख्या करून आजरा तालुक्यावर अन्याय केलेला आहे. त्यामुळे नागरिकांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे भाविष्यात नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. आजरा तालुका डोंगराळ भाग असून कोकण सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून आहे या भागात पावसाचे प्रमाण जास्त असलेने झोन क्रमवारीत डी झोन म्हणून नोंद आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, बुलढाणा, यवतमाळ, पुणे मधील तालुक्यात ज्याप्रमाणे सदस्य संख्येमध्ये न्याय दिलेला आहे. त्याप्रमाणे आजरा तालुक्याला न्याय देऊन 4जिल्हापरिषद व 8पंचायत समिती सदस्य संख्या व गण रचना करावी अशा आशयाचे निवेदन शिवसेना (शिंदेगट)आजरा तर्फे जिल्हाधिकारी यांना दिले आहे. त्याचप्रमाणे याची प्रत पालकमंत्री यांनाही देण्यात आली आहे.
निवेदनावर संजय पाटील, राजेंद्र सावंत,विजय थोरवत, इंद्रजित रावसाहेब देसाई, महादेव मोरे, संतोष भाटले, अनिल डोंगरे, प्रकाश पाटील, संजय शेणवी,दयानंद निऊंगरे आदींच्या सह्या आहेत.
Youtube लिंक
https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH
- व्हॉट्सॲप चॅनल
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
फेसबुक पेज लिंक
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
लिंक मराठी वेबसाईट
www.linkmarathi.com
वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.
Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]
*Follow Us*

मुख्यसंपादक