Homeघडामोडीइराण-इस्रायल युद्ध पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

इराण-इस्रायल युद्ध पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


कोल्हापूर ( लिंक मराठी न्यूज ) -:
इराण आणि इस्रायल यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून काही ठिकाणी विमान सेवा बंद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, कोल्हापूर यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील जे नागरिक पर्यटन, नोकरी किंवा शिक्षणानिमित्त आखाती देशांमध्ये तसेच इस्रायल, इराण आदी ठिकाणी वास्तव्यास आहेत, त्यांनी कोणतीही भीती बाळगू नये, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. केंद्र सरकार आणि राज्य शासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
दरम्यान, या देशांमध्ये अडकून असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या कुटुंबीयांनी संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती (नाव, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट तपशील इ.) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक:
टोल फ्री क्रमांक: १०७७
दूरध्वनी क्रमांक:
०२३१-२६५९२३२
०२३१-२६५२९५०
०२३१-२६५२९५३
०२३१-२६५२९५४
मोबाईल क्रमांक: ८२७५१२१०७७
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, कोल्हापूर यांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावे, असेही आवाहन केले आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular