Homeघडामोडीस्व. राजारामबापू देसाई फाउंडेशन आजराच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर संपन्न

स्व. राजारामबापू देसाई फाउंडेशन आजराच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर संपन्न

आजरा (हसन तकीलदार ):-स्व. राजारामबापू देसाई फाउंडेशन आजरा हे विविध सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवत अनेक सामाजिक कार्यें करीत आहे. आज जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधत स्व. राजारामबापू देसाई फाउंडेशनने अण्णासाहेब गळतगे लायन्स ब्लड बँक गडहिंग्लज यांच्या सहकार्याने शिवतीर्थ जवळील आजरा तालुका खरेदी विक्री संघाच्या इमारतीमध्ये भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सुरवातीला मान्यवारांच्या हस्ते स्व. राजारामबापू देसाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व त्यानंतर रक्तदानासाठी रक्तदात्यांची नोंदणीला सुरवात करण्यात आली. यावेळी रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विक्रमी 154 जणांनी श्रेष्ठदान रक्तदान केले.


1978 मध्ये के. डी. सी. सी. बँकेत संचालक म्हणून राजारामबापू निवडून आले. ते 2004 पर्यंत बँकेचे संचालक होते. 1987मध्ये त्यांनी के. डी. सी. सी. बँकेच्या चेअरमन पदाची धुरा सांभाळली. तालुका खरेदी विक्री संघाला अडचणीतून बाहेर काढून संघाला संजीवनी देण्याचे काम राजारामबापूनी केले होते. तालुक्याच्या राजकारणात तसेच सहकारात त्यांनी आपला ठसा उमटवून अमिट छाप सोडली होती. केडीसीसी बँक, तालुका संघ, जनता बँक, आजरा साखर कारखाना, विकास सोसायटी, पत संस्था यासारख्या सहकारी संस्थांना योगदान दिले होते याबरोबरच बाजार समिती गडहिंग्लज चे सभापती पद ही त्यांनी भूषवले होते. त्यांच्या पश्च्यात सुधीरभाऊ देसाई यांनी त्यांच्या राजकीय वारसाचा वसा घेत जिल्हापातळीपर्यंत त्यांनी आपली छाप सोडली आहे. राजारामबापू फाउंडेशनची स्थापना करून त्यामार्फत सामाजिक कार्य सुरु केले आहे. अण्णासाहेब गळतगे ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिरात 154 बॅगांचे संकलन करून आज उचांक गाठला आहे.
यावेळी फाउंडेशनचे संस्थापक सुधीरभाऊ देसाई,अध्यक्ष वृशाल हुक्केरी, उपाध्यक्ष युवराज पोवार, खजिनदार रवींद्र देसाई, सचिव तुकाराम प्रभू, अनिल फडके (ता. अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ), सुभाष देसाई (साखर कारखाना व्हा. चेअरमन ),राजेश जोशीलकर (कारखाना संचालक ), राजेंद्र मुरुकटे (कारखाना संचालक ),दिगंबर देसाई (कारखाना संचालक ),गोविंद पाटील (कारखाना संचालक ), एम के देसाई (कारखाना संचालक ),जनार्दन बामणे (तालुका संघ मॅनेजर ),भैरवी सावंत, डी. ए. पाटील (व्हा. चेअरमन, संघ ), विठ्ठलराव देसाई, महादेव हेब्बाळकर, संभाजी पाटील,सिद्धार्थ पाटकर, महेश पाटील, हरिश्चंद्र व्हरकटे, डॉ. सुभाष पाटील (मेडिकल ऑफिसर ), अनिल आडावकर (पी आर ओ ), अश्विनी पाताडे (टेक्निशियन )व इतर सहकारी कर्मचारी तसेच राजारामबापू समर्थक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Youtube लिंक👇

https://youtube.com/@linkmarathi-news?si=gxRWKqmw6V24xhxH

  • व्हॉट्सॲप चॅनल 👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

फेसबुक पेज लिंक 👇

https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL

लिंक मराठी वेबसाईट 👇

www.linkmarathi.com

वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून ‘लिंक मराठी Live’ चे ताजे अपडेट्स पाहू शकता.

📲 Follow Us | आमचं अनुसरण करा:
[ Whatsapp Chanel ] [Facebook Page ] [YouTube]

        *Follow Us*
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular