Homeघडामोडीव्यंकटराव येथे लोकमान्य टिळक पुण्यदिन व अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम संपन्न

व्यंकटराव येथे लोकमान्य टिळक पुण्यदिन व अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम संपन्न

आजरा(हसन तकीलदार).. येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा येथे लोकमान्य टिळक पुण्यदिन व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर व पर्यवेक्षिका सौ. व्ही.जे. शेलार यांचे हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. इयत्ता दहावी अ वर्ग व वर्गशिक्षक एम.एम. एलगार यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रिया अरविंद देशमुख ,सिमरन भिकाजी पाटील व अदिती अशोक नरके यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त या महापुरुषांची माहिती दिली. कु. सृष्टी संजीव नाईक (इ.10वी अ) हिने रेखाटलेले लोकमान्य टिळक यांच्या चित्राने सर्वांचे लक्ष वेधले. शिक्षकांबरोबरच प्राचार्य व पर्यवेक्षिका यांनीही चित्राचे कौतुक करून तिचा सत्कार केला.


एस.वाय. भोये यांनी आपल्या मनोगतामध्ये लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान, त्यांचे प्रसिद्ध वर्तमानपत्र केसरी यातून त्यांनी केलेली जनजागृती तसेच इंग्रजांच्या अनेक निर्णयाच्या विरोधात आंदोलने केली त्यांच्यावर खटला नोंदवून न्यायालयातून त्यांना शिक्षा झाली मंडालेच्या तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले तिथे त्यांनी “गीतारहस्य “हा ग्रंथ लिहिला . स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळविणारच या आपल्या निर्णयाशी ते आयुष्यभर ठाम राहिले आणि देशाला स्वातंत्र्यही मिळाले..


व्ही. टी. कांबळे यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचेविषयी आपल्या मनोगतात सांगितले की, दीड दिवसाची शाळा शिकलेले अण्णाभाऊ कामाच्या व भाकरीच्या शोधात जवळजवळ अडीचशे मैल वारणा ते मुंबई पायी प्रवास करून.. मुंबई गाठली. अनेक प्रकारची कामे केली. दुकानाच्या पाट्या वाचत ते वाचायला आणि लिहायला शिकले… लेखक आणि काव्य ही प्रतिभा अंगी असल्याने त्यांनी लेखनाला सुरुवात केली. अनेक कादंबऱ्या, कथासंग्रह, प्रवास वर्णन त्यांनी लिहिले.. त्यांची फकीरा ही कादंबरी परदेशातल्या अनेक भाषेत छापली गेली.. यांच्या या लेखनातील अतुलनीय कामगिरीतून रशियामध्ये त्यांचा पुतळाही उभारला‌. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी असणारे अण्णाभाऊ हे लावणीकार, छक्कडकार, शाहीर, लेखक, कथा- कादंबरीकार, नाट्यकार, अभिनेते, वादक, संगीतकार म्हणून संपूर्ण देशभर सुप्रसिद्ध आहेत. त्यांचा आज जन्मदिवस.


त्यानंतर प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ. दहावीतील विद्यार्थी प्रणव भगवान पाटील व शलाका ओंकार गिरी यांनी केले. व आभार प्रेम रमेश येसणे यांनी मानले.

📢 अपडेट्स मिळवा – फक्त “लिंक मराठी” वर!

📲 आजच फॉलो करा आणि रहा अपडेटेड!

📺 यूट्यूब चॅनेल: 👉

https://youtube.com/@linkmarathi-news?si=esDLx1PYMWMRWxXk

📘 फेसबुक पेज:👇

https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL

💬 Follow the Link Marathi channel on WhatsApp: 👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

🌐 वेबसाईट:

www.linkmarathi.com

🗣️ स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज आणि सत्य परिस्थिती – आता तुमच्या मोबाईलवर!

📌 “लिंक मराठी” – जे मराठी बोलतं, मराठी जगतं!

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular