Homeक्राईममोठी कारवाई! 3 आरोपी जेरबंद; 7 घरफोड्या उघडकीस, 21 लाखांचा मुद्देमाल जप्त

मोठी कारवाई! 3 आरोपी जेरबंद; 7 घरफोड्या उघडकीस, 21 लाखांचा मुद्देमाल जप्त

आजरा / कोल्हापूर (प्रतिनिधी):
कोल्हापूर जिल्ह्यातील घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत 3 आरोपींना अटक करून तब्बल 7 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून, सुमारे 20 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तपास करत आरोपींना जेरबंद केले.
तपासादरम्यान आरोपींनी गडहिंग्लज, आजरा, भुदरगड व चंदगड तालुक्यांमध्ये दिवसा घर बंद असल्याचा फायदा घेत घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपींना अटक केली.


अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
रज्जाक अस्लम मुजावर (रा. नांदे, ता. मिरज, जि. सांगली)
तेजस तानाजी पाटील (रा. कोरिवडे, ता. आजरा, जि. कोल्हापूर)
विनायक सिताराम हेर (रा. हस्तीवडे, ता. आजरा, जि. कोल्हापूर)
आरोपींकडून 100 ग्रॅम सोन्याचे दागिने, 230 ग्रॅम चांदी, ट्रॅक्टर, महिंद्रा मॅक्स वाहन, तीन मोटरसायकली व इतर साहित्य असा एकूण ₹20,85,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या आरोपींकडून गडहिंग्लज, भुदरगड, आजरा, चंदगड तसेच दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) येथील एकूण 7 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. संबंधित गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular