आजरा(हसन तकीलदार ):- येथील तालुक्याच्या ठिकाणी खेड्या-पाड्यातील, वाडी- वस्तीतील, बहुजन समाजातील गोरगरीब कुटुंबातील मुलां- मुलींनी चांगले दर्जेदार शिक्षण घ्यावे या हेतूने 1932 साली स्थापन झालेल्या आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा या संस्थेचे अध्यक्ष म्हणून जयवंतराव शिंपी यांनी व्यंकटराव शिक्षण संकुलात शैक्षणिक व भौतिक सुविधा वाढवत नेत आज इयत्ता पहिली ते पदवीपर्यंतचे शिक्षण प्राथमिक, हायस्कूल, ज्युनिअर व वरिष्ठ महाविद्यालय एकाच छताखाली आणले आहे.
आजच्या प्रगतशील आधुनिक युगामध्ये विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळणे हे अत्यंत गरजेचे झाले आहे यासाठी शाळेत आय. टी. लॅब आहे पण त्यामध्ये विद्यार्थ्यांना पुरेसे संगणक उपलब्ध नसल्याबाबत ज्या वेळेला आमदार सतेज पाटील यांना कळविले गेले त्यावेळी त्यांनी तातडीने व्यंकटराव शिक्षण संकुलातील होतकरू व गोरगरीब विद्यार्थ्यांना संगणकाचे अद्यावत ज्ञान मिळालेच पाहिजे या उदात्त हेतूने शाळेसाठी डेल कंपनीचे आय फाईव्हचे 12 संगणक संच भेट स्वरूपात देऊन शिक्षणाप्रती व आजरा तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयवंतराव शिंपी व युवा नेते अभिषेक शिंपी यांच्याप्रतीही आदर व प्रेम व्यक्त केल्याचे दिसून आले.
या संगणक संचांचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते प्रशालेत करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष एस. पी. कांबळे, सचिव अभिषेक शिंपी, खजिनदार सुनील पाटील, संचालक कृष्णा पटेकर, सचिन शिंपी, विलास पाटील, व्यंकटराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष शेळके , ज्युनियर कॅालेज व हायस्कूल चे नूतन प्राचार्य एम.एम. नागुर्डेकर, प्राथमिकचे मुख्याध्यापक रणजीत देसाई, ज्युनियर कॉलेज व्यवस्थापक एम. ए. पाटील व व्यंकटराव परिवारातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
🌿 आपल्या मातीशी नाळ जुळलेली, आपल्या लोकांच्या हक्काची व्यासपीठ – Link Marathi 🌿
तुमची गोष्ट, तुमच्याच भाषेत सांगणं हीच आमची जबाबदारी आहे.
🫱 तुमचा पाठिंबा , आमची ताकद!
व्हाट्सअँप चॅनेल लिंक👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक