Homeमुक्त- व्यासपीठवाढदिवसाच्या सेलेब्रेशनचे स्वरुप सार्वजनिक बनवणं आवश्यक आहे का….?

वाढदिवसाच्या सेलेब्रेशनचे स्वरुप सार्वजनिक बनवणं आवश्यक आहे का….?

मला आता त्या पुस्तकाचे नाव एक्झॅक्ट आठवत नाही पण त्या पुस्तकात फार छान संदेश दिला आहे … त्याची एक समरी सांगतो. वाढदिवस हा अँक्युअली दुःखाचा क्षण आहे. आपल्या आयुष्यातील एक वर्ष निघून गेले, कमी झाले, आपला मृत्यू जवळ आला हा वाढदिवसाचा स्पष्ट – स्पष्ट अर्थ आहे.आणि या निघून गेलेल्या दुःखाचा क्षणाचे सेलेब्रेशन आपण चाकू या हत्याराने (काही ठिकाणी तर तलवारीने) केक कापून करतो मला हि एक अघुरी प्रथा वाटते..खऱ्या अर्थाने माझ्या मते वाढदिवस म्हणजे काय…???
तर आपण आत्मचिंतन करायचा दिवस… कि झालेल्या वर्षात आपण काय कमवलं आणि काय गमावलं..आणि इथून पुढच्या आयुष्याची रणनीती काय ..??
तसेच पाठीमागच्या वर्षी झालेल्या चुका दुरुस्त करून येणाऱ्या नवीन वर्षात नवीन संकल्प करून मार्गस्थ होण्याचा दिवस आहे.
वाढदिवस सेलेब्रेशन करायचं म्हटलं कि केक, हार, नारळ आणि काही ठिकाणी फटाके (एकेका ठिकाणी तर अंडी एकमेकांना फेकून मारतात) हे सगळं आलचं आणि हे सगळ फ्रेंन्ड सर्कल ने केले म्हणून आपली ऐपत असो किंवा नसो फ्रेंन्ड सर्कलला पार्टी तर द्यावीच लागणार….मग त्या पार्टीसाठी दिवसभर शेतात राबवलेल्या आई वडीलांच्या घामाचे का पैसे असेनात. लहान फ्रेन्ड सर्कल असेल तर २-३ हजार खर्च होणार…(२-३ हजार हा खर्च एखाद्या गरिब कुटुंबाचा किराणा बाजार भागवू शकतो, एखाद्या गरिब मुलांचा वार्षिक शिक्षणाचा खर्च असु शकतो, एखाद्या पेशन्टचा औषधांचा खर्च असु शकतो)…


आपण बऱ्याच ठिकाणी ऐकलं किंवा वाचलं असेल तलवारी केक कापला म्हणून फौजदारी गुन्हे दाखल झालेले. मी म्हणतो या सगळ्या व्यापात कशाला पडायला. तुम्ही वाढदिवस एखादे झाड लावून सेलेब्रेशन करू शकता. मुळात वाढदिवस हा सार्वजनिक कार्यक्रमच नाही तो एक घरगुती कार्यक्रम आहे. पण याच रुपांतर आज सार्वजनिक बनताना दिसत आहे. आणि माझ वैयक्तिक मत आहे ( वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मत असु शकतात) हे वाढदिवसाचे सार्वजनिक स्वरूप बनायला राजकिय लोक कारणीभूत आहेत.
मला एक प्रश्न पडतो पाच वर्षे वाढदिवस राजकीय लोकांचा साजरा केला जातो..आणि निवडणूक जवळ आली का कार्यकर्त्यांचा तेवढा एकच वर्षे (निवडणूकीचे वर्षे) साजरा केला जातो…इतर चार वर्षे कार्यकर्त्यांचे वाढदिवस का साजरे केले जात नाहीत… का चार वर्षे त्यांचा वाढदिवस नसतो का…???
बंधूंनो वाढदिवस साजरा करताना फक्त मेणबत्ती पेटवली जात नाही. त्या मेणबत्ती बरोबर तिथला राजकीय नेता तुम्हाला ऐककांबद्दल पेटवत असतो, तुमचा संसार पेटवत असतो, तुमची ऐन उमेदीची तरुणाई पेटवत असतो. तुमचं उज्ज्वल भवितव्य पेटवत असतो. हे कधीही विसरू नका….


माझ वैयक्तिक मत आहे कशाला हे सगळ. एखाद्या तरुणाचा सार्वजनिक वाढदिवस साजरा केला कि आतून त्याचा युवा नेता जागृत होतो.त्याला गावपातळीवरचा पुढारी बनायची स्वप्न खुणावू लागतात. तो आहे हे घरातील काम सोडतो आणि गावात पुढारपण करतो. आणि अशातच ऐन उमेदीचे वय वाया घालवतो. हि झाली खेडेगावातील परिस्थिती. शहरातील तरूण तर डायरेक्ट भाईच बनतो आणि पुढे जाऊन तो टोळीच करतो आणि गुन्हेगारीकडे वळतो.

लेखन -रमेश पवार ( मगरवाडी , पंढरपूर )

🌿 आपल्या मातीशी नाळ जुळलेली, आपल्या लोकांच्या हक्काची व्यासपीठ – Link Marathi 🌿

तुमची गोष्ट, तुमच्याच भाषेत सांगणं हीच आमची जबाबदारी आहे.

🫱 तुमचा पाठिंबा , आमची ताकद!

व्हाट्सअँप चॅनेल लिंक👇

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

You Tube Chanel लिंक 👇

https://youtube.com/@linkmarathi-news?si=jnYGl9mKXFfRdD_y

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular