मुकेश अंबानींनी काही मिनिटांत कमावले 80800 कोटी
1 एप्रिल ते 10 जुलै, म्हणजेच 100 दिवसांत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 18 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
Mukesh Ambani:मुकेश अंबानींच्यारिलायन्स इंडस्ट्रीजकडून रविवारी मोठी एक बातमी आली. Jio Financial Limited, 20 जुलै रोजी एक वेगळे युनिट बनेल आणि IPO देखील लवकरच आणला जाईल. या बातमीनंतर आज सकाळपासून रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आकडेवारीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सने सर्वाधिक उच्चांक गाठला असून, कंपनीचे मार्केट कॅप 18.50 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. काही मिनिटांत मुकेश अंबानींच्या रिलायन्सला 80,800 कोटींहून अधिक नफा झाला आहे.
रिलायन्सचे शेअर्स विक्रमी पातळीवर
शेअर बाजारातील तेजीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ होत आहे. ट्रेडिंग सत्रादरम्यान, कंपनीच्या शेअरने 2,755 रुपयांचा सर्वोच्च उच्चांक गाठला आहे. दुपारी 2.20 वाजेपर्यंत कंपनीचा शेअर 4.26 टक्क्यांच्या वाढीसह 2747.60 रुपयांवर व्यवहार करत होता. कंपनीचा शेअर आज 2686 रुपयांवर ओपन झाला होता.
100 दिवसांत 18 टक्के वाढ
चालू आर्थिक वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये चांगली वाढ होताना दिसत आहे. कंपनीच्या स्टॉकमध्ये 100 दिवसांत 18 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, 31 मार्च रोजी कंपनीचा शेअर 2331.05 रुपयांवर होता, ज्यामध्ये आतापर्यंत 424 रुपयांची वाढ दिसून आली आहे. दुसरीकडे, जर आपण जुलैबद्दल बोललो तर, कंपनीच्या स्टॉकमध्ये 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, 30 जून रोजी कंपनीचा शेअर 2,550.70 रुपयांवर होता, जो 204 रुपयांपेक्षा जास्त वाढला आहे.
कंपनीची 80800 कोटींहून अधिक कमाई
कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे बाजारात तेजी आली आहे. आकडेवारीनुसार, कंपनीचा शेअर 2,755 रुपयांवर पोहोचला तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप 18,63,858.21 कोटी रुपयांवर पोहोचले होते. शुक्रवारी कंपनीचे मार्केट कॅप 17,83,043.16 कोटी रुपये होते. याचा अर्थ कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 80,800 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.