माझ्या मित्राचा मला फोन आला ..अरे मी एक टपरी घेऊ का भाडयाने मिन्स अतिशय कमी भाडे आहे , त्यात सुरू करतो , मस्त पैकी चिकन बिर्याणी चा पार्सल …कमी भाडे आहे , होईल फायदा चटकन …
मी त्याला काही प्रश्न विचारले ..
१) ती टपरी किंवा तुझ्या व्यवसायाची जागा अधिकृत आहे का ?
२) तुझ्या कडे पुढील 12 महिने धंदा न होता त्या टपरी मिन्स जागेचे भाडे द्यायचे पैसे आहेत का ?
३) पार्सल साठी ती जागा योग्य आहे का ?
४) तू बिर्याणी कुठे बनवणार आहेस ?
५) त्या भागात बिर्याणी विकली जाऊ शकते का ?
६) होम डिलिव्हरी सुरू करणार असशील तर तू नसताना कोण लक्ष देणार आहे ?
७ ) फक्त बिर्याणी का अजून काही असणार आहे ?
मित्राने सर्व ऐकले म्हणाला अरे ह्यातील एकही प्रश्नांचा मी विचार केला नव्हता मला ती जागा अतिशय कमी किंमतीत भाड्याने मिळत होती , मी लागलीच प्लॅन केला की करुया बिझनेस , ती जागा अधिकृत नाही हे तो मालक स्वतःच म्हणाला , मीच एकटा असणार आहे सगळे करण्यासाठी …आता काय करू कळत नाही ..
एकच कर घरातून सुरवात कर ..ऑर्डर साठी डिजिटल माध्यमातून जाहिरात कर , लोकांच्या आधी ऑर्डर घेत मगच बनवत जा..सुरवातीला धावपळ होईल पण नुकसान नाही होणार ..जागेचे भाडे मध्ये पैसे आधी न गुंतवता चांगल्या वस्तू घेण्यात गुंतव ..तांदूळ , तेल , मसाला चांगला वापर कर , काहीही नाव आणि जागा नसताना तुझ्या हातची चव लोकांना पटते का ते बघ ..हल्ली जो तो घरीच मागवतो किंवा सांगू त्या जागेवर येऊन घेऊन पण जाणारा ग्राहक आहे ..ग्राहकांना खुश कर बघ ..नक्कीच बिर्याणी तुझी ओळख करून देईल ..
हो आशिष नक्कीच तू सांगितले ते पटले मग कधी आणून देऊ तुला ” बिर्याणी “
व्यवसाय सुरू करणे सोप्पे , पण टिकवणे कठीण , घरातल्या लोकांना बनवलेले जेवण आवडते ह्यावरून लागलीच कॅटरिंग सेवा सुरू करणे म्हणजे मोठी चूक …
व्यवसाय करायचा मग कुठलीही फ्रेंचायझी घेणे पण चूक …
व्यवसाय सुरू करण्या अगोदर योग्य व्यक्ती कडून मार्गदर्शन करा…मगच व्यवसाय करा …
लेखक – अज्ञात
मुख्यसंपादक