आजरा – (अमित गुरव ) -: आजरा शहर व उपनगराला नियमित व वेळेवर पाणी पुरवठा होत नसल्याने 11 मार्च 2025 रोजी आजरा ग्रामस्थानी पुकारलेल्या महामोर्चा बाबत अन्याय निवारण समिती व सर्वपक्षीय वतीने निवेदन दिले आहे.
शहर वासियांना नियमित पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या त्यासाठी अन्याय निवारण समितीने पाठपुरावा केला 1/1/2025 रोजी उपोषणाला बसले तेव्हा 15 दिवसात पाणी पुरवठा व्यवस्थित करण्यात येईल असे लेखी उत्तर देण्यात आलेले होते. पण वेळोवेळी पाठपुरावा करून देखील हा प्रश्न अद्यापही सुटला नाही फक्त वेळ काढू पणाची कामे आपल्या कार्यालयातून सुरू आहेत. त्यामुळे या जनाक्रोशाला तुम्हाला 11 मार्च रोजी सामोरे जावे लागेल.

निवेदनावर विजय थोरवत [शिवसेना शहर प्रमुख] , सुधीर भाऊ देसाई (संचालक के डीसीसी बँक )मुकुंद दादा देसाई (काँग्रेस आजरा तालुकाध्यक्ष) संपत देसाई ( कॉम्रेड प्रदेश अध्यक्ष ) परशुराम बामणे (अध्यक्ष अन्याय निवारण समिती )उदय जी पवार (माजी सभापती पंचायत समिती आजरा )व पांडुरंग सावरतकर, गौरव देशपांडे ,ज्योतिबा आजगेकर, दिनकर जाधव,मिनीन डिसोजा, बडोपंत चव्हाण ,वाय बी चव्हाण, अमित सामंत, विक्रम सिंग देसाई , रशीद पठाण ( माजी पंचायत समिती सदस्य )संतोष डोंगरे यांच्या सह्या आहेत.

मुख्यसंपादक