Homeघडामोडीछोट्या पावलांची मोठी भक्ती – भादवणचे छोटे वारकरी सज्ज !

छोट्या पावलांची मोठी भक्ती – भादवणचे छोटे वारकरी सज्ज !

भादवण (अमित गुरव ) – आदर्श विद्या मंदिर, भादवण शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावात पारंपरिक वेशभूषेत, टाळ-मृदंगाच्या गजरात, विठुनामाच्या घोषात एक भक्तिपूर्ण दिंडी काढली. लहानग्या विद्यार्थ्यांनी साकारलेला हा पायी वारीचा सोहळा ग्रामस्थांना एक वेगळा आध्यात्मिक अनुभव देणारा ठरला.

वारकरी परंपरेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, तसेच त्यांच्यातील संस्कार आणि भक्तीची भावना वृद्धिंगत व्हावी, यासाठी शाळेतील शिक्षक वृंदांनी विशेष मेहनत घेतली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक भगवे, पांढरे पेहराव परिधान करून, डोक्यावर टोप्या आणि हाती टाळ-भगवे ध्वज घेऊन ही दिंडी साजरी केली.

गावातून दिंडी निघाल्यानंतर ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. शिस्तबद्ध मिरवणूक, टाळ-मृदंगाचे ताल, “ज्ञानोबा माऊली तुकाराम ” चा जयघोष, यामुळे अवघे भादवण भक्तिरसात न्हाल्यासारखे वाटले.

या सुंदर उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्मिकतेसोबतच सामाजिक शिस्त आणि एकोप्याचेही बाळकडू मिळाले. शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षक मंडळींनी संयोजन करत या उपक्रमाची सुंदर मांडणी केली.

हा भावनिक आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य या उपक्रमातून साध्य झाले, असे मत ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केले.

🟢 दैनंदिन अपडेट्ससाठी खास निमंत्रण!आपणास महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेची माहिती आणि इतर उपयोगी अपडेट्स दररोज मिळाव्यात, यासाठी आजच खालीलपैकी कोणत्याही पर्यायामध्ये सामील व्हा:

📌 WhatsApp Group – नियमित अपडेट्ससाठी

📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा (📝 टीप: चॅनेल फॉलो केल्यास तुमचा मोबाईल क्रमांक इतर फॉलोअर्सना दिसत नाही.)

🌐 सदस्य व्हा आणि अपडेटेड रहा – विश्वासार्ह माहितीचा तुमचा स्रोत

https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

व्हाट्सअप ग्रुप 👇

https://chat.whatsapp.com/KXy0XT9XJRpChVuADfr21r?mode=r_c

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular