Homeघडामोडीडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विधायक कार्य प्रवाशांना आणि पोलीस बांधवाना...

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विधायक कार्य प्रवाशांना आणि पोलीस बांधवाना जिलेबी, थंड पाणी बॉटल वाटप


आजरा.(हसन तकीलदार )- आजरा निसर्गरम्य तालुका म्हणून प्रसिद्ध ठिकाण आहे. गोवा राज्याच्या सीमेवर लगत वसलेले निसर्ग संपन्न तालुका. आज 14एप्रिल महामानाव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांची 134 वी जयंती मोठ्या धूमधडक्यात साजरी करण्यात आली.
डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांची प्रतिमा रथातून पारंपारिक वाद्याच्या गजरात व फुलांच्या उधळण करीत आजरा शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी श्री. सुभाष सोमा कांबळे (सामाजिक कार्यकर्ते )मित्र परिवार श्री. जितेंद्र कांबळे (गांधीनगर )तर्फे आजरा बस स्टँड व कंट्रोल रूम, प्रवासी, तसेच कर्तव्यतत्पर असणारे पोलीस जे उन्हात आपली सेवा प्रामाणिकपणे बजावत होते त्यांना थंड पाणी बॉटल व जिलेबी वाटपाचा कार्यक्रम आज दिवसभर करण्यात आला. यावेळी बोलताना सुभाष कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की,या सामाजिक उपक्रमास ज्ञात अज्ञात व्यक्तींनी अनमोल सहकार्य केले त्यांचे मनापासून आभारी आहोत आणि अशीच कायम साथ राहो. आपल्या थोर महापुरुषांनी दिलेली शिकवण ही कायम तेवत ठेवत सामाजिक उपक्रम रबवणार असले बद्दल सांगितले.


यावेळी शिवराज लोखंडे,(वझरे ),राज मांढरे (उत्तूर )विनायक कांबळे, ब्लु स्टार युवा मंच बुरुडचे ऋषिकेश कांबळे, कुणाल कांबळे, मयूर कांबळे, स्वप्नील कांबळे, संकेत कांबळे, शुभम कांबळे नितीन यादव, अक्षय माळी तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते..

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular