आजरा(हसन तकीलदार):-सद्या जुने मिटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरु आहे. तालुक्यातील अंदाजे 65%जुनी मिटर बदलून स्मार्ट मीटर बसवले गेले आहेत परंतु काही ग्राहकांनी आणि संघटनानी या स्मार्ट मीटरला विरोध केल्यामुळे अजून अंदाजे 35% जुनी मीटर बदलायचे शिल्लक आहेत. स्मार्ट मीटरचे रिडींग घेण्याची गरज नाही मात्र जुन्या मीटरचे रिडींग घेतल्याशिवाय वीज बिल देता येत नाही परंतु स्मार्ट मीटर बसवल्यामुळे रिडींग घेण्याचा ठेका बंद झाल्याने वीज कंपनीकडून घरगुती कनेक्शनची वीजबिले ग्राहकांना रिडींग घेण्याअगोदरच अंदाजाने व दुप्पट दिली जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना रीडींग घेऊनच वीज बिले द्यावीत अशा मागणीचे निवेदन शिवसेना उबाठा तर्फे उपअभियंता वीजवितरण कंपनी आजरा यांना देण्यात आले आहे.

जुन्या मिटरच्या वीज ग्राहकांची बिले रिडींग घेतल्याशिवाय देऊ नयेत तसेच विभागाकडून दुरुस्ती देखभाल व वसुलीसाठी वेगवेगळी टीम नेमलेली आहे. जर एखाद्याच्या घरातील वीज बंद होते त्यावेळी कर्मचारी ऑनलाईन तक्रार करा मगच आम्ही दुरुस्ती करू असे सांगतात त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना ऑनलाईन तक्रार वेळेवर करणे जमत नाही तर काही ग्रामीण भागातील ग्राहकांना ऑनलाईन तक्रारच करता येत नाही त्यामुळे वायोवृद्ध तसेच लहान मुलांना रात्रभर अंधारात राहावे लागते तसेच वसुलीचे पथक हे किरकोळ 500₹ थकीत असणाऱ्या ग्राहकांचेसूद्धा सूचना न देता विजखांबावरून वीज कनेक्शन बंद केले जाते त्यामुळे त्या ग्राहकांना वीज बिल भरूनही दुसऱ्या दिवसापर्यंत ताटकळत बसावे लागते. हे सर्व अन्यायकारक असून यावर तात्काळ तोडगा काढावा अन्यथा जनआंदोलन करू असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर संभाजी पाटील(उपजिल्हा प्रमुख), युवराज पोवार(तालुका प्रमुख), दिनेश कांबळे(शेतकरी सेना तालुका प्रमुख),शिवाजी आढाव, संजयभाई सावंत(देऊळवाडी), बिलाल लतीफ, प्रकाश गुडूळकर, अमित गुरव आदींच्या सह्या आहेत.
✅ दैनंदिन अपडेट्स हवे आहेत?
मग आजच Link Marathi सोबत जोडून रहा!
📲 WhatsApp Channel (तुमचा नंबर पूर्णपणे सुरक्षित)
👉
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
▶️ YouTube – ताज्या बातम्या आणि व्हिडिओंसाठी
👉
https://youtube.com/@linkmarathi-news?si=4ycB0yncq6Xs8asH
महत्वाच्या बातम्या, माहितीपूर्ण लेख, आणि दैनंदिन घडामोडी — एकाच ठिकाणी!

मुख्यसंपादक



